शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

मनोवांच्छित ते देणारा सिद्ध‍िविनायक

मनोकामना पूर्ण करणारे देवस्थान

ShrutiWD
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी सम:प्रभ:
निर्विघ्नम: कुरूमे देव: सर्व कार्ये सुसर्वदा

सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कला आणि विद्येची देवता असलेल्या आणि विघ्नांचे हरण करणाऱ्या या गणेशाचा रूप प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळलेली असते. अशीच गर्दी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरातही दिसून येते. हे मंदिर खूप प्रसिद्ध असून येथे मनोकामना पूर्ण करणारा सिद्ध‍िविनायक आहे.

सिद्ध‍िविनायक मंदिराची फोटोगॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

धर्मयात्रा या सदरात आज आम्ही मुंबई येथील सिद्ध‍िविनायक मंदिराचे दर्शन घ़डविणार आहोत. या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचे रूप इतर मंदिरातील मूर्तींपेक्षा वेगळे आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणापासून तयार केलेली असून अडीच फूट उंच व दोन फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या गळ्यात भुजंग आहे.

ShrutiWD
तसेच मूर्तीच्या कपाळावरील त्रिनेत्राचे चिन्ह शिवरूपाचे प्रत‍ीक दर्शविते. सिद्धिविनायकाचे हे शिवरूप विलक्षण आहे. या मूर्तीला रोज नारंगी रंगाचे वस्त्र चढविले जाते. त्यामुळे मूर्ती काळसर रंगाऐवजी लालसर दिसते. गणेशाच्या हातात मोदक आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत.

रिद्धी-सिद्धीला विद्या आणि धनसंपत्तीची देवता मानले जाते. या दोन मूर्ती विराजमान असल्यामुळे या मंदिराला सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते.

साधारणत: गणपतीची सोंड हाताकडे उलट्या स्वरूपात वळलेली असते. परंतु या मुर्तीची सोंड सरळ हाताकडे अशा स्वरूपात वळलेली आहे. म्हणूनच या विघ्नहर्त्याचे रूप विलोभनीय आहे. मंदिराची निर्मिती 19 नोव्हेंबर 1801 रोजी झाली. मंदिराच्या परिसर नेहमी वर्दळीचा आणि रहदारीचा होता.

मंदिर रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे धूळ आणि केरकचरा मोठ्या प्रमाणात जमत असे. नंतर मंदिराचा जीर्णाद्धार एका महिलेने केला. या जीर्णोद्धाराचीही एक कथा आहे. या परिसरातील काकासाहेब मार्ग आणि एस. के. बोले मार्ग नेहमी वाहतुकीने गजबजलेला असल्यामुळे वाहनांचा कर्कश आवाज ऐकू येत असे.

ShrutiWD
माटूंगा येथील आगरी समाजाच्या श्रीमती देऊबाई पाटील यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्रीमती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्थिक मदतीवर व्यावसायिक लक्ष्मण विठू पाटील यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. श्रीमती पाटील यांच्याकडे संपत्ती मोठ्या प्रमाणात होती. पण त्यांना मूल नव्हते. त्या रात्रंदिवस पुत्रप्राप्तीसाठी गणपतीची पूजा करत असत.

पुत्र झाल्यावर गणपतीचे एक भव्य मंदिर बांधेन असा नवस त्यांनी केला होता. गणपती पूजेवर त्यांचा खूप विश्वास होता. म्हणून त्यांनी एका मूर्तिकाराला घरातील दिनदर्शिकेवर असलेल्या गणपतीसारखीच हुबेहूब मूर्ती तयार करण्यास सांगितले. योगायोगाने ते चित्र मुंबईतील वाळकेश्वर येथे असलेल्या बाणगंगाचे होते आणि ती मूर्ती 500 वर्ष जुनी होती.
ShrutiWD
परंतु, काही दिवसानंतर त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि पुत्रप्राप्तीची मनोकामना अपूर्णच राहिली. पण आपल्याला नाही तर दुसर्‍यांना तरी पुत्रप्राप्ती होईल. त्यांची इच्छा पूर्ण होईल, या विचाराने त्यांनी मंदिराच्या बांधकामाला सुरवात केली.

त्यानंतर हे मंदिर तयार झाले. या मंदिराचा इतिहास ऐकून असे वाटते की सिद्धिविनायकाने स्वर्गीय देऊबाई पाटलांची प्रार्थना ऐकली. कारण आज लाखो भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सिद्धिविनायकाला नवस करतात. सिद्धिविनायक त्यांना रिकाम्या हाताने मागे पाठवत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे.

प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण केली जाते. अशा प्रकारे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार्‍या या सिद्धिविनायक मंदिराला 'नवसाचा गणपती' आणि 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून ओळखले जाते.

आज या मंदिराला गजाननाच्या विशेष मंदिराचा दर्जा प्राप्त झाला आहे. मंदिर एवढे प्रसिद्ध आहे की सर्वसामान्यांपासून अति महत्त्वाच्या व्यक्तीदेखील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्रंदिवस लोकांची गर्दी असते. दूरदूरचे लोक या मंदिराचे दर्शन करण्यासाठी येतात.

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला अनवाणी चालून गेल्यास गणपती आपला सर्व त्रास सहन करतो व आपली इच्छा पूर्ण करतो असे मानले जाते. या विश्वासाने लोक दर बुधवारी आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्री देखिल मंदिराकडे पायी जातात.

ShrutiWD
सिद्धिविनायकाला कसे जावे: सिद्धिविनायकाचे मंदिर मुंबईत आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराला 'आंतराष्ट्रीय गेटवे' असे म्हटले जाते. येथे पोहचणे अतिशय सोपे आहे. मुंबईला जाण्यासाठी रस्ता मार्ग, रेल्वे मार्ग, हवाईमार्ग यापैकी कोणत्याही मार्गाने अगदी सहजतेने जाता येते. मंदिर परिसरात अनेक धर्मशाळा आणि हॉटेल राहण्यासाठी उपलब्ध आहेत.