testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मी समुद्राच्या पाण्याचा थेंबही नाही-कार्तिकी

WDWD
तुम्ही आम्हाला सेलिब्रेटी म्हणता. पण आम्ही मोठे झालेलो नाही. संगीताच्या समुद्रातील आम्ही थेंबही नाही, असे आम्हाला वाटतं, हे चिमुरडी म्हणते तेव्हा ती लहान आहे हे पटत नाही. 'लिटिल चॅम्प्स' पर्वाची महाविजेती असलेली कार्तिकी उत्तम गायिका तर आहेच, पण या लहान वयातच गाण्याने आणि विचारांनाही बरीच पक्व झालेली आहे. म्हणूनच 'मी विजेती झाली ही औपचारीकता आहे. खरं तर आम्ही सर्व विजेतेच आहोत, अशी माझी भावना आहे, हे तिचे सांगणेही तिच्या या वैचारिक परिपक्वतेचे उदाहरण दाखवून देणारे आहे.

'सारेगमप'चे पर्व संपल्यानंतर आता आयुष्याची खुली स्पर्धा सुरू झालीय. पण कार्तिकीला तिचे भय नाही. या स्पर्धेनेच दिलेली शिदोरी तिच्यासाठी एवढी मोठी आहे, की त्याबळावर आयुष्यात पुढे वाटचाल सहज करता येईल, असे तिला वाटते. हा प्रवास सोपा नाही, याचीही तिला कल्पना आहे. लोकांच्या अपेक्षाही खूप आहेत. त्या अपेक्षांची पूर्तीही करायची आहे. पण त्यासाठी संगीताचा ध्यास कायम ठेवावा लागेल आणि रियाज वाढवावा लागेल हे तिचे उत्तर आहे.

कार्तिकीच्या या स्वरप्रवासात तिचे संगीतकार वडिल कल्याणजी गायकवाड यांचेही मोठे योगदान आहे. प्रत्येक गाण्याची प्रॅक्टिस तिचे वडिल करून घेत होते. कार्तिकीने या स्पर्धेत वडिलांची बरीच गाणी गायली. कल्याणजी स्वतः संगीतकार आहेत. पण कार्तिकीच्या गाण्यांमुळे त्यांची गाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचली. याविषयी स्वतः बोलताना कार्तिकी म्हणाली, बाबांचे संगीतधन आतापर्यंत वारकर्‍यांपर्यंत मर्यादीत होते. पण मी मुद्दामहून त्या रचना गायल्या. आता त्या बर्‍याच लोकांपर्यंत पोहोचल्या. मला त्याचा खूप आनंद आहे.'

सारेगमप'च्या कार्यक्रमाने आपल्याला खूप काही दिल्याची तिची भावना आहे. ती म्हणते, मला गाण्यात जे पाहिजे होतं ते मिळालं. अनेक गोष्टी समजल्या. स्वप्नात ज्यांना भेटणेही कठीण अशी मोठी माणसे पहायला मिळाली. त्यांच्याकडून काही घेता आलं. म्हणूनच स्पर्धेतून जेव्हा मी बाहेर पडले होते. तेव्हा हे सगळं सुटणार म्हणून मला वाईट वाटलं होतं. विजेतेपद मिळवता येणार नाही, याचं दुःख मला कधीच नव्हतं. म्हणूनच कॉल बॅक एपिसोडसाठी पल्लवीताईकडून फोन आला तेव्हा मला अतिशय आनंद झाला. त्याही एपिसोडमध्ये मी माझं उत्तम ते द्यायचं ठरवलं होतं.

अभिनय कुलकर्णी|
महाविजेती झाल्यानंतर आळंदीत मोठी मिरवणूक काढण्यात आली. कार्तिकीला रथात बसविले होते. तब्बल दीड-दोन किलोमीटरची गर्दी होती. दीडशे किलो पेढे वाटले गेले. पण हे प्रेम तिला केवळ आळंदीतच मिळाले असे नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरही जिथे मराठी ऐकली वा बोलली जाते अशा सर्व ठिकाणच्या लोकांनी तिच्यावर तितकेच प्रेम केले. पण या प्रेमाची, आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची तिला भीती वाटत नाही. गाणे अजून पक्के करण्यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करण्याचा तिचा मानस आहे. त्यासाठी हवा तेवढा रियाज करण्याची तिची तयारी आहे.

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

ठाकरे सिनेमातला आवाज बदला

national news
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...

उरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी

national news
पायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...

'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का

national news
सत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...

नेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली

national news
नेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...

आठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'

national news
शिमगा... कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे ...