Widgets Magazine

सोनं खरेदी करण्याआधी.....

लग्नसराईच्या दिवसात सोन्याची खरेदी होत असते. त्यात सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांची चांदी होते. पण सोनं खरेदी करताना तुमची फसवणूक तर होत नाही, याची काळची घेणंही गरजेचं आहे. जाणून घ्या या सोनं
खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.....

* कॅरेटवरून सोन्याची शुद्धता ठरते. सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं. 24 कॅरेटमध्ये 99 टक्के सोनं असतं. सोनं हा तसा मरू धातू, नाणी घडवण्यासाठी त्याचा वापर होते. पण सोन्यात दागिने घडवणं थोडं कठिण पडतअसल्याने त्या इतर धातूंचं मिश्रण केलं जातं. आपल्या देशात सोन्यातून दागिने घडवले जातात. यात 91.6 टक्के सोनं असतं. हिरे किंवा इतर मौल्यवान धातू जडवलेले दागिने 18 कॅरेट सोन्यात बनतात.

*
सोन्याची नीट पारख करून घ्या. हॉलमार्कवाले दागिने शुद्ध मानले जातात. त्यामुळे दागिने घडवताना सोनं हॉलमार्क प्रमाणित असल्याची खात्री करून घ्या.



यावर अधिक वाचा :