रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (14:27 IST)

वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याआधी

आरओ किंवा वॉटर प्युरिफायर घेण्याच्या विचारात असाल तर काही बाबींकडे लक्ष द्या. विविध कंपन्यांच्या वॉटर प्युरिफायरच्या जाहिराती आपण बघतो. यापैकी कोणता प्युरिफायर घ्यायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. प्युरिफायर खरेदी करण्याबाबतचं हे मार्गदर्शन...
* वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याआधी पाण्याची टीडीएस पातळी जाणून घ्या. टीडीएस म्हणजे पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण. पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण 400 पीपीएमपेक्षा अधिक नसावं. पाण्यात क्षारांचं प्रमाण अधिक असेल तर हा खारेपणा दूर करण्याची क्षमता असणार्यार प्युरिफायरची निवड करा. तसंच आरओ प्लस यूव्ही तंत्रज्ञानयुक्त प्युरिफायर योग्य ठरेल. पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण कमी असल्यास आरओ प्युरिफायर खरेदी करू शकता.
* प्युरिफायरची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता तपासून बघा. तुमच्या भागातले लाईट जात असतील तर पाणी साठवून ठेवणारा प्युरिफायर घ्या. इलेक्ट्रिक प्युरिफायरमध्ये 12 लीटर पाणी साठवलं जातं तर साध्या प्युरिफायरची क्षमतात्यापेक्षा जास्त असते.
* प्युरिफायर खरेदी करताना त्याच्या किमतीकडे लक्ष द्यायला  हवंच. शिवाय त्यातला फिल्टर किती वेळा बदलावा लागणार आहे हेही जाणून घ्या.
* प्युरिफायरची वॉरंटी तसंच कंपनीकडून दिल्या जाणार्या सोयीसुविधांची माहिती करून घ्या. प्युरिफायर बिघडल्यास कंपनी किती काळ मोफत सेवा देणार हे जाणून घ्या. तसंच कंपनीचं सेवा केंद्र घराच्या जवळ आहे ना, याची खात्री करून घ्या.
* वॉटर प्युरिफायरच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. प्युरिफायर स्वयंपाकघरात बसवला जात असल्याने त्यावर तेलाचे डाग पडू शकतात. त्यामुळे तो वरचेवर स्वच्छ करत राहा. प्युरिफायरच्या स्वच्छतेसाठी भांडी घासण्याचा साबण किंवा लिक्विड, लिंबू, व्हिनेगार यापैकी काहीही वापरता येईल.