सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (16:50 IST)

परीक्षेची तयारी करताना या गोष्टींचे सेवन करा मेंदू तीक्ष्ण होईल

मुलांची परीक्षा जवळ येते तेव्हा मुलांच्या मनात एक भीती असते, एवढे सगळे कसे काय लक्षात राहील ? या साठी मुलं रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात आणि सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेणे करून त्यांना फायदा मिळेल.परंतु काहीही लक्षात ठेवण्यासाठी आणि पाठांतर करण्यासाठी निरोगी असणे आवश्यक आहे. या साठी अशा काही गोष्टी आहे ज्यांच्या उपयोगाने मेंदू च्या आरोग्यास आणि मानसिक कार्यक्षमतेस चालना मिळेल. चला तर मग त्या गोष्टी विषयी जाणून घेऊ या.
 
1 सफरचंद-
बऱ्याच वेळा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी लक्षात राहत नाही जर आपल्याला आपले मेंदू तीक्ष्ण करावयाचे आहे तर दररोज सफरचंदाचे सेवन करावे. सफरचंदात आढळणारे क्यूरसेटिन नावाचे अँटी ऑक्सिडंट आपल्या मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. या पेशींना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यावर बौद्धिक क्षमतेत अधोगती येते. तसेच सफरचंदाचं सेवन केल्यानं अल्झायमर सारख्या आजाराचा धोका कमी होतो.
 
2 सोयाबीन -
सोया पासून बनविलेल्या गोष्टींमुळे देखील मेंदू तीक्ष्ण होण्यात मदत  मिळून गोष्टी लक्षात ठेवता येतात. सोयापासून बनलेल्या पदार्थात पॉलिफेनॉल्स नावाचे अँटिऑक्सिडंट आढळतात, शरीरात सोया उत्पादनांची कमतरता झाल्यावर स्मरणशक्तीमध्ये कमतरता येते. सोया उत्पादनांमध्ये आयसोफ्लेवोन्स नावाचे पॉलिफेनॉल्स असतात, जे रासायनिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि हे मेंदूला थेट फायदा देतात.
 
3 अंडी -
अंडी खाण्यास आवडत असल्यास हे आपल्या मेंदूला तीक्ष्ण करण्यास मदत करत. अंडीमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आढळतात, म्हणून अंडी निसर्गाचे मल्टीव्हिटॅमिन म्हणून ओळखले जाते. अंडी मध्ये व्हिटॅमिन बी 12 ,कोलीन आणि सेलेनियम मेंदूच्या संरचनेसाठी आवश्यक असतात. अंडी मध्ये व्हिटॅमिन बी 6 ,बी 12 आणि फॉलिक ऍसिड असते आणि हे व्हिटॅमिन मेंदूला संकुचित होण्यापासून वाचवतात. म्हणून अंडींचे सेवन करून आपण आपल्या मेंदूला तीक्ष्ण करू शकता.
 
4 मासे 
आपण मांसाहारी असल्यास, मासे खाऊन फायदा मिळू शकतो. मासे खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. या मुळे आपल्याला काहीही लक्षात ठेवणे सहज होते. मासे मध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात,जे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माशातील व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम मेंदू चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मानले जाते. या व्यतिरिक्त आपण सिट्रस फ्रूट म्हणजे द्राक्षे, संत्री, नारंगी ह्याचे सेवन करावे. जेणे करून या मुळे मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत मिळेल.