शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (08:45 IST)

लहान घरांना द्या मोठं लुक!

आजकाल शहरांमध्ये जागेची समस्या नोकरीपेक्षा जास्त मोठी झालेली आहे, म्हणूनच लोकांना आता लहान जागेत राहून समाधान मानावं लागतं. पण घर लहान असले तरी काय? तुम्ही त्यालासुद्धा सुंदर बनवू शकता, त्यासाठी थोडी रचनात्मकता व कल्पनाशीलतेची गरज असते. 
 
त्यासाठी काही टिप्स : 
 
1. लहान खोल्यांना मोठे दाखवण्यासाठी गडद रंगांचा प्रयोग करणे टाळावे. 
 
2. हलक्या रंगांचा वापर करावा. हलके रंग प्रकाशाला प्रतिबंधित करून भिंतींचे दूर होण्याचा आभास करवतात. गडद रंगांमुळे जागा कमी वाटते.
 
3. जाड व लांब-लचक फर्निचर ठेवणे टाळावे. रुंदित कमी असलेले हलके-फुलके फर्निचर ठेवावे. फर्निचर, बेडशीट, कुशन इत्यादीसुद्धा हलके व पेस्टल रंगांचे ठेवावे. त्यात जास्त डिझाइन किंवा पेर्टन नको. नाहीतर डोळ्यांवर तान पडतो व खोलीसुद्धा लहान दिसते.