नातं जोडण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा दुरावा येणार नाही
जेव्हा दोन लोक नात्यात जुळतात तेव्हा ते आपला संपूर्ण वेळ मन, इच्छा, गुण दोष सर्व काही एकमेकांशी सामायिक करतात.ते आपला भूतकाळच आपल्या समोर ठेवत नाही तर भविष्यातील योजना देखील एकमेकांसह आखतात. नात्यात छोट्या छोट्या गोष्टींमुळे तक्रार होणं भांडण होणं साहजिक आहे. ते असायला पाहिजे. परंतु जर या गोष्टी हे भांडण विकोपाला गेले तर नात्यात दुरावा येतो. असं होऊ नये या साठी या काही गोष्टींना आपण आपल्या आयुष्यात समाविष्ट करू शकता. जेणे करून नातं दृढ होईल. नात्याला दृढ करण्यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
* घाईत निर्णय घेऊ नका-
आपला जोडीदार आपल्याला काही सांगत आहे तर लक्ष देऊन ऐकून घ्या. असं बऱ्याच वेळा होत की एखादा आपल्या केलेल्या गोष्टींबद्दल सांगत असत तर आपण पूर्ण न ऐकून घेता त्यावर निर्णय घेऊन मोकळे होतो. असं करू नका. कळत नकळत आपण जोडीदाराला दोषी म्हणून सिद्ध करतो. असं करणे टाळा. कोणतेही निर्णय घेण्यापेक्षा ते काय सांगत आहे ते ऐका आणि असं काही बोला जे त्यांच्या आत्मविश्वासाला वाढवेल. आणि मनातील तणाव कमी करेल.
* एकमेकांशी बोला-
कोणत्याही दृढ नात्याचा कणा असतो संवाद किंवा बोलणे. नातं सुधारण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे आपल्या जोडीदाराचे म्हणणे काहीही अंदाज न लावता ऐकावं . एकमेकांमध्ये कधीही हारणे -जिंकणे नसत. आपल्या जोडीदाराचे ऐकून घ्या आणि त्यांना असं दर्शवावे की आपण त्यांना ओळखून आहात. समजत आहात.
* आपसात एक नियम बनवा-
आजी-आजोबांच्या काळी नियम असायचा की दोघांचा दिवस कसाही गेला किती ही मतभेद झाले तरी रात्रीचे जेवण ते एकत्र करायचे या मुळे एकमेकांची काळजी घेत सर्व मतभेद दूर होत होते. असे काही आपण देखील करावे. जेणे करून एकमेकांसह अधिक वेळ घालवता येईल.
* स्वतःला वेळ द्या-
लग्नगाठीत जुळल्यावर असे काही नाही की स्वतःसाठी वेळच काढायचा नाही. स्वतःसाठी वेळ द्या. आणि आपल्याला जे आवडेल ते करा. आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी स्वतःसाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. असं केल्याने नातं बहरेल आणि निरोगी राहील .