शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

स्वयंपाकघरामधील मार्बलच्या प्लॅटफॉर्म काळजी कशी घ्याल?

स्वयंपाकघरामध्ये ओट्यासाठी संगमरवर वापरले गेलेले आपण नेहमीच पाहतो. त्यामुळे ओटा जरी छान दिसत असला तरी त्याचा वापर जर व्यवस्थित केला गेला नाही तर त्याचा लूक खराब होण्याची शक्यता असते. संगमरवर किंवा मार्बलवर तेल, ज्यूससारखे पदार्थ सांडल्यावर जर ते लगेचच पुसले गेले नाहीत तर त्यांचे डाग मार्बलवर पडण्याची शक्यता असते. आपण स्वयंपाक करत असताना किती तरी वेळेला भाजी ढवळलेला चमचा ओट्यावर चटकन ठेऊन देतो. अशा वेळेला त्या चमच्याला लागलेल्या साल्याचे डाग मार्बलवर पडू शकतात. त्यामुळे हाताशी नेहमी एखादी छोटी प्लेट किंवा वाटी असावी ज्या मध्ये हातातला चमचा ठेवता येईल. जर काही कारणांनी मार्बलवर डाग पडलेच तर अमोनियाचे काही थेंब आणि हायड्रोजन पेरॉक्साईड यांच्या मिश्रणाने हे डाग निघण्यास मदत मिळू शकते.
 
काहींना भाज्या किंवा फळे ओट्यावरच चिरायची सवय असते. किंवा चॉपिंग बोर्ड काढून पुन्हा धुऊन कोण ठेवणार हाही कंटाळा असतो. पण असे करताना आपल्या मार्बलवर सुरीमुळे ओरखडे उठण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी अगदी एकच मिरची जरी चिरायची असेल तरी चॉपिंग बोर्डचा वापर करावा. ग्रॅनाईट हे मार्बलच्या मानाने अधिक कणखर असल्यामुळे त्यावर सहजासहजी ओरखडे उठत नाहीत. मार्बल हा दगड तितका कणखर नसल्याने कुठलीही धारदार वस्तू त्यावर वापरताना काळजी घ्यावी.
 
मार्बल उष्णतारोधक असला तरीही अगदी कडकडीत गमर भांडी त्यावर ठेवणे टाळावे. त्यासाठी आधी एखादी मॅट ओट्यावर पसरून मगच त्यावर गमर भांडे ठेवावे. मॅट न वापरता जर मगर भांडे सरळ मार्बलवरच ठेवले गेले तर जिथे भांडे ठेवले तेथील मार्बलचा रंग खराब होऊ शकतो. मार्बलचा ओटा पुसताना पाण्यामध्ये थोडेसे डिशवॉशिंग लिक्विड घालून त्या श्रिणाने पुसावे. तारेच्या घासणीने ओटा जोरजोरात घासणे टाळावे. आजकाल मार्बल वा ग्रॅनाईटचे ओटे साफ करण्याकरिता विशेष लिक्विड्‌स बाजाराध्ये उपलब्ध आहेत, जमल्यास त्यांचा वापर करावा..नसेलतर पाणी आणि कुठलाही डिशवॉश लिक्विड यांचे मिश्रण उत्तम.