सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (08:50 IST)

पतींना बायकोच्या या सवयी आवडत नाही जाणून घ्या

समाजात पती आणि पत्नीचे नाते पवित्र मानले आहे. या नात्यात जेवढे प्रेम,आपुलकी,जिव्हाळा आहे,तेवढेच रुसवे,फुगवे,भांडणे आणि मतभेद देखील आहे. परंतु जिथे प्रेम आहे तिथे मतभेद होणारच .परंतु बऱ्याच वेळा असे बघण्यात आले आहे की पती पत्नींमध्ये पटत नाही, त्याचे कारण म्हणजे पतींना आपल्या पत्नीच्या काही सवय आवडत नाही त्यामुळे ते चिडतात आणि त्यांच्या मध्ये भांडणे आणि मतभेद होतात. आपल्या मध्ये देखील अशा काही सवयी असतील तर आजच या सवयींना बदलून टाका. जेणे करून आपल्या मध्ये भांडण होणार नाही.चला तर मग जाणून घेऊ या.
 
* राग करणे -बऱ्याच वेळा असे बघितले जाते की बायका आपल्या नवऱ्यावर खूप रागावतात. तर नवरे शांत असतात.आणि काही तर याचा विरोध देखील करतात. या मुळे घरात मतभेदाची स्थिती बनते. आणि घरात वादावादीचे तणावाचे वातावरण निर्माण होतात. याचा प्रभाव मुलांवर देखील होतो. असं होऊ देऊ नका. राग राग करू नका. 
 
*  टोमणे मारणे- बऱ्याच वेळा असे बघितले आहे की बायकांनी दिलेल्या टोमण्या मुळे नवरे त्रस्त होतात आणि गंमतीमध्ये दिलेले टोमणे देखील भांडण्यासाठी कारणीभूत होतात. या मुळे घराचे वातावरण देखील बिघडते. म्हणून टोमणे देऊ नका.
 
*  शॉपिंग जाणे- काही बायका दर दोन चार दिवसाने शॉपिंग ला जातात. त्यांच्या या सवयीला पती कंटाळतात कारण बऱ्याच वेळा बायका गरज नसताना देखील खरेदी करून आणतात आणि पैसे वाया घालवतात या मुळे पैशाची ओढाताण होते.असं करू नका आपल्या परिस्थितीचे भान ठेवून वागावे आणि खर्च करावे. 
 
* संशय करणे- असं म्हणतात एकदा मनात संशयाचे बी रोपलें की त्याचे कोणी काहीच करू शकत नाही. बऱ्याच बायकांना आपल्या पतीवर संशय घेण्याची सवय असते. त्यांचा मोबाईल तपासणे, घरी उशिरा का आला अशा प्रश्नांनी त्या पतीला हैराण करतात या गोष्टीचा राग पतींना येतो आणि भांडणे होतात.