सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (22:19 IST)

Eating Habits जेवण्याच्या सवयीने जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव

food
गोड खाणारे लोकं प्रेमळ तर तिखट खाणारे लबाड असतात, हे आम्ही नाही शोधात सिद्ध झाले आहे. खाण्याची आवड निवड लोकांच्या स्वभावाबद्दल संकेत देते. सगळ्यांच्या खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. काही लोकं हळू- हळू जेवतात तर काही लोकं भराभर खातात. काय आपण कधीही आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विचार केला आहे? पहा आपला स्वभाव कसा आहे ते...
 
* हळू- हळू जेवणारे लोकं कधीही घाईत नसतात. ते वर्तमानात जगण्यात विश्वास ठेवतात. आपल्या नोकरीत- धंध्यात ते हळू-हळू आणि प्रामाणिकपणे काम करतात. असे लोकं स्वभावाने जरा जिद्दी असतात आणि आपल्या नियमांवर जगू इच्छितात.
 
* भराभर जेवणारे लोकं चावून-चावून खाण्याबद्दल विचार करत नाही. ते केवळ घाईघाईने जेवण संपवण्यावर लक्ष केंद्रित करतात. ऑफिसमध्ये अश्या लोकांवर बॉस खूश असतात कारण ते आपले कार्य जलद गती पार पाडतात. असे लोकं मल्‍टी टास्किंग असतात. आपल्या पार्टनरची आवश्यकताही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
 
* नवीन पदार्थ ट्राय करणारे लोकं रोमांचक असतात. अश्या लोकांचे पार्टनर त्यांच्यासोबत बोर होतोय असं कधीच फिल करत नाही. नवीन आयडिया शेअर करायला हे कधीच मागेपुढे बघत नसतात. अश्या लोकांच्या मित्रांची संख्या जास्त असते.
food
* एकाच वेळी सर्व पदार्थ मिक्स करून जेवणार्‍यावर त्यांचे बॉस नेहमी खूश असतात. कारण असे लोकं सर्व जबाबदार्‍या घेऊन त्या व्यवस्थित पार पाडतात. नात्यांतही सर्वांचे हृदय जिंकून घेतात कारण ते सर्वांना पर्याप्त वेळ देतात. पण सर्वांना आश्वासन देत राहिल्यामुळे हे अनेकदा संकटातही सापडतात.
 
* गोड खाणारे लोकं शांत आणि दयावान असतात. असे लोकं इतरांची समस्या ऐकून घेण्यासाठी सदैव तत्पर असतात.
 
* तिखट खाणारे लोकं घातक असू शकतात. हे एका घटक्यात प्रेमळ तर दुसर्‍या क्षणात लबाड बनून जातात. पण आपण संकटात असल्यास ते धावून मदतीलाही येतात.