testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पावसाळ्यात रंगकाम करताय?

paint in ranyseason
करताना हे बरंच जिकिरीचं काम. रंगाचा वास, घरभर धूळ, पसारा, सामानाची बांधाबांध, हलवाहलवं आणि नंतर आवराआवर. नुसत्या विचारानंच नकोस वाटतं. अखेर आज काढू, उद्या काढू असं म्हणता म्हणता काहींना ऐन पावसळ्यात रंग काढण्याचा मुहूर्त गसवतो. मग सतराशे साठ कॅटलॉग्स डोळ्यांखालून घातले जातात. रंगाचे प्रकार, रंगसंगती ठरवल्या जातात. तरीही पावसाळ्यात रंगकाम करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.
लवकर सुकत नाही. त्यामुळे काढताना थोडीशी काळजी घ्यावी.

रंग ओला राहिल्यामुळे त्यावर बुरशी पकडते. याचं भान राखून रंग काढावा.

पासवसाळ्यात भिंतीना ओलावा येतो. या ओलाव्यामुळे भिंतीना केलेला गिलावा, लांबी ओली राहिल्यामुळे कालांतराने रंगाचे पापुद्रे सुटतात. त्यामुळे रंग निघून जातो.

या दिवसात घराला, इमारतींना बाहेरून रंगकाम करणं अधिक हितावह असतं. कारण बाहेरचं रंगकाम शक्यतो सिमेंट पेंटमध्ये करतात. त्यासाठी संपूर्ण बिल्डिंग धुवून, घासून घ्यावी लागते. कारण पावसाळ्यात इमारतीच्या बाहेरील भागावर शेवळसदृश वनस्पती पकडलेली असते. त्यामुळे तिला घासून साफ केल्यामुळे इमारतीचा भाग व्य‍वस्थित साफ होतो. त्याला रंगही चांगल पकडतो. त्यासाठी खूप पाण्याचीही आवश्यकता असते. तसंच सिमेंट पेंटला एका कोट केल्यावर दुसरा कोट करण्यापूर्वी त्याव र पाणी मारणं आवश्यक असतं. कारण सिमेंट पेंटवर पाणी न मारल्यास उन्हामुळे तापून रंगाची भुकटी पडू लागते. त्यामुळे पावसाळा संपत आला असताना बाहेरील रंगकाम केल्यामुळे पाण्याची बचत होते. रंगकामाला आवश्यक असलेला ओलावा इमारतींच्या भिंतींना या मोसमात नैसर्गिक‍रीत्या मिळतो. त्यामुळे रंग वर्षभर टिकतोही.

पाऊस कमी झाल्यावर इमारतीला बाहेरच्या बाजूने रंगकाम करताना प्लास्टर करावं. त्यानंतर रंगकामाला सुरुवात करावी. त्यामुळे इमारतींतून होणार्‍या गळतीला अटकाव होतो. इमारतीच्या भिंतीचं आयुष्य वाढतं. लोखंडी सळ्या, खांबांना गंज पकडत नाही.


यावर अधिक वाचा :

संगीत व नवी भाषा शिकल्याने जास्त प्रभावी होतो मेंदू

national news
एखादी नवी भाषा बोलण्यास शिकणे आणि वाद्य वाजविण्याचे कौशल्य प्राप्त केल्यामुळे आपला मेंदू ...

पत्नीसोबतचा डीपी ठेवला नाही, केली पोलीसात तक्रार

national news
उत्तर प्रदेशच्या साहिबाबादमध्ये पतीने पत्नीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवला नाही ...

सर्व इलेक्‍ट्रिक वाहने 2050 पर्यंत शक्‍य

national news
भारतात 2030 पर्यंत सर्व वाहने इलेक्‍ट्रिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र ते ...

कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

national news
जनता दल (सेक्युलर)चे एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ...

अंदमानात मान्सून दाखल

national news
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील 48 तासांत बंगालच्या उपसागरातील अन्य भागातही मान्सून ...