रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (14:48 IST)

Tips And Tricks: कपड्यांवरील चिकटलेला च्युईंगमला काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

बहुतेक लोक च्युइंगम खाण्याचा आनंद घेतात. पण कधी कधी चुकून कपड्यांवर च्युइंगम चिकटतो. ते नीट काढता येत नाही. त्यामुळे कपडे खराब होतात आणि नंतर ते घालावेसे वाटत नाही. कपड्यांवरील चिकटलेला च्युईंगमला काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा
 
1 इस्त्रीची मदत घ्या -
च्युइंगम काढून टाकण्यासाठी कपड्यांचे इस्त्री देखील उपयुक्त ठरू शकते.या sathi एक पुठ्ठा घ्या आणि इस्त्री करणाऱ्या बोर्डवर ठेवा. लक्षात ठेवा की च्युईंगमची बाजू खालच्या दिशेला असावी. इस्त्री हलकी गरम करा.नंतर च्युईंगम लागलेल्या ठिकाणी हळुवार ठेवा नंतर कपड्याला पुठ्यावरून उचलून घ्या च्युईंगम निघून जाईल. नंतर कापड स्वच्छ धुवून घ्या. 
 
2  टूथपेस्ट लावा -
च्युइंगम काढण्यासाठी टूथपेस्टचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी च्युइंगमच्या भागावर थोड्या प्रमाणात टूथपेस्ट लावा. नंतर पसरवा आणि च्युइंगम तुटे पर्यंत चोळा. टूथब्रशने उरलेले  तुकडे काढा. तुम्ही ते थंड पाण्याने धुवा. नंतर कपडे स्वच्छ धुवा.
 
3 बर्फाने च्युइंगम काढा-
दोन बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये काही बर्फाचे तुकडे ठेवा आणि ते तुमच्या कपड्याच्या च्युइंगम लागलेल्या भागाच्या खाली आणि वर ठेवा. च्युइंगम कडक झाला की तो खरवडण्यासाठी चमचा वापरा. शेवटी, तुम्ही टूथब्रशने च्युइंगम  काढून टाका. यानंतर कपडे स्वच्छ धुवा.
 







Edited By - Priya Dixit