शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (15:38 IST)

Covid-19 : कपड्यांना या प्रकारे करा Disinfect, जाणून घ्या टिप्स

कोविड-19 पासून बचावासाठी अनेक प्रकारे काळजी घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे स्वच्छता.
 
घराची स्वच्छता, वारंवार हात धुणे, फळं आणि भाज्यांना सॅनिटाइज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या काळात लहान चुका देखील धोकादायक ठरू शकतात म्हणून स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 
सोबतच कपड्यांची स्वच्छता राखणे देखील गरजेचे आहे. आम्ही येथे आपल्याला स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी कशी ठेवावी यासाठी टिप्स देत आहोत. कपड्यांना कशा प्रकारे सॅनिटाइज करता येईल हे सांगत आहोत.
 
कोरोना व्हायरस आपल्या कपड्यांमध्ये देखील असू शकतं म्हणून बाहेरुन घरात आल्यावर सर्वात आधी कपडे बदलून स्वच्छ कपडे घालावे. नंतर कुटुंबाच्या सदस्यांच्या संपर्कात यावे.
 
बाहेरुन आल्यावर कपडे इकडे-तिकडे न लटकवता त्यांना लगेच धुऊन टाकावे. या बाबतीत आळशीपणा नुकसान करू शकतो.
 
कपडे गरम पाण्यात डिटर्जेंट टाकून भिजवावे. 
 
नंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ धुवावे.
 
कपडे धुतल्यावर त्यांना डेटॉलच्या पाण्यात टाकून पिळून घ्यावे.
 
कपड्यांना उन्हात वाळत घालावे. नंतर प्रेस करून ठेवावे.