testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शेअर बाजाराचा नवा उच्चांक

मुंबई| WD| Last Modified शुक्रवार, 7 मार्च 2014 (10:57 IST)
चालू खात्यावरील तूट (कॅड) कमी झाल्याने आणि सकारात्मक घटनांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दाखविला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गुरुवारी नोंदविला.
डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ‘कॅड’ घसरून ‘जीडीपी’च्या तुलनेत 4.2 अब्ज डॉलरवर गेली. त्यामुळे बाजारातील व्यवहार सुरू होतानाच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता. सत्रांतर्गत व्यवहारात सेन्सेक्स 21,525 अंशांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. अखेरीस 237.01 अंशांची वाढ नोंदवून 21,513.87 अंशांच्या उच्चांकावर बंद झाला. या पूर्वीची सेन्सेक्सची उच्चांकी पातळी 21,372.66 अंश होती. तीन सत्रांत सेन्सेक्स 567 अंशांनी वधारला. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी या शेअरमुळे बाजारात वाढ होण्यास मदत झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 72.50 अंशांनी वधारून 6,401.15 अंशांच्या उच्चंकी पातळीवर बंद झाला.

‘परकीय गुंतवणुकीचा ओघ चांगला असल्याने आणि रिटेल गुंतवणूक वाढल्याने बाजारात वाढ होण्यास मदत झाली. निवडणुकीपूर्वी बाजारात तेजी दिसते, असा अनुभव आहे आणि ती दिसत आहे. निवडणुकीत चांगला निकाल लागेल, अशी अपेक्षा असल्याने आगामी
काळात बाजारात वाढ होऊ शकते, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केला. युरोपीय बाजारात असलेल्या सकारात्मक प्रवाहाचा प्रभाव बाजारातील वातावरणावर पडला.


यावर अधिक वाचा :

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

शिवसेनेना सरकारच्या बाजूने मतदान करणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला ...

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

national news
'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...