शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By भाषा|

शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळला

दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान पडझड झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक मोठ्या अंकांनी कोसळल्याचे दिसून आले .राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 28 अंशांनी तर बीएसईचा निर्देशांक 79 अंशांनी घसरला.

महिंद्रा, जयप्रकाश असोसिएटस, डीएलएफ, एसीसी, टाटा स्टील, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5.24 ते 2.24 टक्क्यांची घसरण झाल्याने बाजार अस्थिर झाला.

दुसरीकडे निफ्टीतही एचसीएल, सुजलॉन, युनिटेक, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5.61 ते 2.77 टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी 28 अंशांनी घसरत 5008 अंशांवर तर बीएसई 79 अंशांनी घसरल्याने 16780 अंशांवर बंद झाला.