शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (17:04 IST)

युक्तीच सर्वश्रेष्ठ

kid story
नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेवहा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर गाढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. 
 
तात्पर्य : युक्तीने सर्व प्रकारच्या अडचनीतून पार पडता येते.