testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठी कथा : एक्सचेंज ऑफर

Last Modified गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (11:52 IST)
दिवाळीचे दिवस होते. शहरातले बाजार दिव्याच्या रोशणाईने सजलेले होते. प्रत्येक घर रोषणाईने झगमगत होतं. शहरामध्येच दिवाळीच्या प्रसंगी मेळा लागलेला होता. या मेळ्यात निरनिराळी दुकाने होती. काही दुकानांमध्ये एक्सचेंज ऑफर होत्या. जुने कपडे, जुनी भांडी, जुने सामान जमा करा व थोडे पैसे वर देऊन नवीन कपडे, भांडी व सामान घेऊन जा, अशी ती ऑफर. जीवनातील जुन्या वस्तूंचा त्याग करून नवीन वस्तूंचा उपभोग घ्या अशी भलावण करण्यात आली होती. या दुकानांत चांगलीच गर्दी होती.

त्या बाजारात असलेलं एक दुकान मला अगदीच वेगळे व नवीन दिसले. ते दुकानही एक्सचेंज ऑफरचेच होते. पण तिथे वस्तू 'एक्सचेंज' होत नव्हत्या. अदली-बदलीचा वेगळ्याच गोष्टीची होती. दुकानात पाटी होती ''जुने गरीब, दात पडलेले, अंगावर सुरकत्या पडलेले कुरूप व गरीब आई बाप देऊन एक्सचेंज करून थोडेसे पैसे जमा करून पसंतीप्रमाणे श्रीमंत व टापटीप दिसणारे नवीन आई बाप घेऊन जा''. विक्रेत्याची कल्पना नक्कीच अभिनव होती. कारण जगामध्ये बरेच लोक असतात त्यांना आपल्या जन्मदात्या आई बापांबद्दल काहीच वाटत नसतं. आई-बापाने त्याच्यांकरिता केलेल्या कष्टाला ही मडळी कर्तव्य व आपला हक्क समजतात. म्हातारे, सुरकत्या असलेल्या व दात पडलेले आई-बाप घेऊन जायला लाज वाटते. मित्रांशी आपल्या आई-बापाचा परिचय करवून देताना त्यांना न्यूनगंड येतो.

''सुधीर आम्हाला पण अमेरिकेला घेऊन चल. आम्हाला या गरिब आणि वंचित जीवनाचा कंटाळा आला आहे. म्हातारपणात तरी काही सुख भोगू दे''

मी या कथेचा निवेदक -सुधीर साने- अशा लोकापैकीच एक होतो. माझे वडील सुधाकर साने व माझी आई सौ. वत्सला साने एका मिडिल स्कूलमध्ये साधारण मास्तर असून त्यांनी मला बी. इ. व नंतर एम. बी. ए चे उच्च शिक्षण दिलं. त्यामुळेच मला अमेरिकेमध्ये न्यूजर्सी या शहरात चाळीस हजार डॉलर महिना अशी नोकरी लागली होती न्यूजर्सी मधील ''रिच इंडियन सिटीजन'' मध्ये मी मोडला जात होतो. माझं तिथे केटलीना लॉरेंस या अमेरिकन मुलीबरोबर लव्ह मॅरेज झालं होतं.

पुण्यातल्या आमच्या जुन्या घराच्या प्रापर्टीच्या ''डिस्पोजल'' साठी मी भारतात आलो होतो. पण इथे आल्यावर माझ्या आई-वडिलांनी माझ्या मागे नवीनच लचांड लावलं होत. ते सारखे एकच टुमण घेऊन बसायचे ''सुधीर आम्हाला पण अमेरिकेला घेऊन चल. आम्हाला या गरिब आणि वंचित जीवनाचा कंटाळा आला आहे. म्हातारपणात तरी काही सुख भोगू दे'' पण मला तर या म्हातार्‍या आई- बापाची सुद्धा लाजच वाटत होती. कुठे माझी अमेरिकेमधली राहणी व हाय स्टेटस आणि कुठे माझे आई-बाप म्हणवणारी ही गलिच्छ माणसं. मला तर यांचा तिटकाराच यायचा, ''हाऊ डर्टी पिपल्स'' मला तर हे माझे आई-बाप आहे हे सांगायलासुद्धा लाजच वाटायची.

अशा विचारातच आई- बापासाठीची एक्सचेंज ऑफर माझ्याकरीता सुवर्णसंधीच होती. नाही काय?

शेवटी मी आपल्या वृद्ध व सतत आजारी राहणार्‍या आई-वडिलांना त्या दुकानात घेऊन गेलो. आवश्यक फॉर्म भरला. माझी वृद्ध व भोळसट आई मला म्हणाली - ''का रे सुधीर आम्हाला इथे कशाला घेऊन आला आहे, आम्हाला इथे काम करायचं आहे?'' मी म्हटलं, आई तुला बाबांसोबत अमेरिकेत चलायचं आहे ना? मग हे तिथलं रजिस्ट्रेशन ऑफिस आहे. मी त्या वृद्ध आई-वडिलांना तिथे सोडून एका बर्‍यापैकी दिसणार्‍या जोडप्याला आपले आई-बाप म्हणून घेऊन आलो. कदाचित याना टाकणार्‍या मुलाला यांच्याहून जास्त टिप-टॉप आई-बाप एक्सचेंज ऑफरमध्ये हवे असतील. असो मला त्याच्याशी काय करायचं होतं?

मी एक्सचेंजमध्ये घेतलेल्या आई-बापांनी आल्याबरोबर आपला खरा रंग दाखवायला सुरवात केली. ते सारखी माझ्यावर चिडचीड करायचे. रागावायचे. आपल्याला विकणार्‍या मुलाचं कौतुकच करायचे. त्यांनी मला खरं प्रेम तर कधी दिलच नाही. मी तरी त्यांच्याकडून अशी अपेक्षा का बरं करावी? मी पण तर त्यांना रुपये देऊन विकतच आणलं होतं. तिथे प्रेमाचा लवलेशही नव्हता. मला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला. दुसर्‍याच दिवशी मी पुन्हा त्या दुकानात गेलो. तिथे माझे जन्मदाते आई-बाप डोळ्यात अश्रू आणि मनामध्ये आशा ठेवून माझी वाट पाहतं होते. 'आमचा सुधीर लवकरच येईल व आम्हाला अमेरिकेला घेऊन जाईल, हीच वेडी आशा बाळगून ते माझ्या येण्याकडे डोळे लावून बसले होते.' पण त्यांना काय माहीत की मी त्यांचा मुलगा किती नालायक होतो व मीच विश्वासघात करून त्यांचाच सौदा केला होता. माझं मन आत्मग्लानीने कष्टी झाले होते. मी निर्णय घेतला की पल्या याच वृद्ध आई-बापांना ते कसे ही असले तरी आपल्याबरोबर घेऊन अमेरिकेला घेऊन जाईन व त्यांना म्हातारपणात काही काळ सुख द्यायचा प्रयत्न करीन.
माझी 'एक्सचेंज ऑफर' ची हौस पार फिटून गेली होती.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

कुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...

national news
* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...

दुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे

national news
गूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर ...

पुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...

national news
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...

मधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा

national news
एक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...

पाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...

national news
कोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...