testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रेमाष्टक

मनोहर धडफळे

वेबदुनिया|

(बा! मन्या.... प्रेम कर.)
मन्या सज्जना प्रेम पंथेचीं जावे!
तरी ही 'करी' भेट ती नेत जावे!
तिला त्याज्य ते सर्व सोडोनी द्यावे!
तिला मान्य ते सर्व भावे करावे ।।1।

तुला व्हायचे बा मन्या प्रेमदेव!
तरीं दृष्टी तू सर्वत्र ठेव!
तुला भेंटेल जी प्रेमे उदार!तिचे प्रेम स्वीकार, स्वीकार स्वीकार ।।2।।

प्रभाते मन्या नेम बांधून घ्यावा!
गजरा फुलांचा तिला नित्य द्यावा!
सदा प्रेममार्गी करी वाटचाल!
धरी रे मन्या मन्या हाचि तू एकताल ।।3।

मन्या सज्जना द्रव्य खर्चीत जावे!तिचे मागणे नित्य पुरवीत जावे!
चिंता धनाची वाहू नये रे!
हिशेब कधीही पाहू नये रे ।।4।।

मन्या आड येता तिचे सर्व भाऊ!
डरोनी त्यांसी नको माघार घेऊ!
वेळीच हाण तू त्यांनाही लाथा!
'प्रसंगी' टेकवी सन्मूख मा था ।।5।।
मन्या सज्जना प्रेम करण्यासी पाहे!
प्रसन्न 'मजनू' सदा त्यांसि आहे!
तया मित्र होती सदा साह्यकारी!
हेचि व्रत म्हणोनी तुवा अंगिकारीं।।6।

'प्रयत्नांती ईश्वर' आहे मन्या रे!
ठाऊक हे ही सकळा जना रे!
जपावे मन्या तरी तू 'प्रेम-प्रेम'!धरी रे मन्या हाचि तू 'नित्यनेम' ।।7।।

'जगी सर्व सुखी' असा कोण आहे!
'विचारी मन्या', तू चि शोधोति पाहे!
करी नित्य-नेमे जो 'प्रियाराधना'!
असे प्रिय तोचि 'सकल नारी-जना।।8।

(रामदास स्वामींनी क्षमा करावी)


यावर अधिक वाचा :

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

शिवसेनेना सरकारच्या बाजूने मतदान करणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला ...

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

national news
'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर ...

जगातील सर्वाधिक उंचीवरचे पोस्ट ऑफिस

national news
देवाची भूमी अशी ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती व्हॅली मध्ये पर्यटकांना अनेक ...