1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (15:09 IST)

Bring Wealth घरात भरभराट हवी असेल तर हे 5 नियम पाळा

भरभराट म्हणजे शुभ स्थिति ज्यात कोणती पण वस्तू जास्त प्रमाणात उपलब्ध असणे. जसे की आवश्यकते पेक्षा जास्त असणे. म्हणजे अन्न एवढे असावे की घरातील सदस्यांन सोबत बाहेरून आलेला अतिथी पण तृप्त होईल तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त धन असणे. चला तर पाहुया घरात भरभराट राहण्यासाठीचे कार्य -  
 
१. अग्निहोत्र कर्म करावे : अग्निहोत्र कर्म दोन प्रकारे असतात. पहिला, आपण जे पण अन्न खाऊ ते आधी अग्निला अर्पित करणे. अग्नीद्वारा शिजवलेल्या अन्नावर सगळ्यात आधी अग्नीचा अधिकार असतो. दूसरा हा की यज्ञानाची विधी जाणून होम करणे. 
 
२. दान करायला शिका : सृष्टीचा हा नियम आहे की, जेवढे तुम्ही दयाल त्यापेक्षा दुपट्ट तुम्हाला मिळेल. जर तुम्ही धन आणि अन्नाला धरुन ठेवाल तर ते सुटून जाईल. दान मध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि मोठे दान हे अन्नदान आहे. गाय, कुत्रा, कावळा, मुंगी, पक्षी यांच्या वाटेचे अन्न काढणे आवश्यक असते. 
 
३. घराची स्वछता : घराला साफ आणि सुंदर ठेवणे. घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवावे. खास करून ईशान्य, वायव्य, उत्तर कोपरा स्वच्छ आणि रिकामा ठेवणे.
 
४. राग-चिडचिड करायची नाही : घरात राग-चिडचिड, रडणे हे आर्थिक समृद्धि आणि ऐश्वर्याचा नाश करते. म्हणून एकमेकात प्रेम आणि आपुलकी बनवून ठेवणे. तसेच एकमेकांच्या भावना समजून घेणे व कुटुंबातील प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेणे, घरातील स्त्रीचा सन्मान करणे, आई, मुलगी, पत्नी यांचा सन्मान करणे आवश्यक आहे.
 
५. जेवण करताना नियमांचे पालन करणे : जेवणाच्या ताटाला नेहमी पाटावर, चटई किंवा टेबलवर ठेऊन सन्मानाने अन्नग्रहण करावे. जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवू नये. तसेच ताटात कधीच अन्न टाकू नये. जेवण झाल्यानंतर ताटाला कधीच किचन स्टेन, पलंग, टेबल यांच्या खाली ठेवू नये किंवा वरती ठेवू नये. ते वेळीच साफ करून घेणे. यासारखे अजुन काही नियम आहेत ज्याचे पालन केल्याने घरात नेहमी भरभराट राहील.