शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:14 IST)

वास्तू टिप्स : हे शुभ चिन्हे लावून घरातील वास्तू दोष दूर करा

वास्तुनुसार घराच्या भिंतींवर काही शुभ चिन्हे लावता येतात. ज्यामुळे घराचे वास्तुदोष दूर करता येतात. चला जाणून घेऊया अश्या काही शुभ चिन्हांबद्दल जे घरात लावल्यानं सौख्य आणि समृद्धी वाढवतात.
 
वास्तू शास्त्रात घराच्या दिशांची काळजी प्रामुख्याने घेतली जाते. कधी कधी घराची रचना अशी असते ज्यामध्ये बदल करणं अशक्य असतं. अश्या परिस्थितीत घरात अशे काही मांगलिक चिन्हे काढतात. ज्यामुळे घरातील वास्तू दोष दूर करता येतं. 
 
* वास्तुनुसार घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक चे चिन्ह बनवावं. स्वस्तिक बनविल्याने नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो. स्वस्तिक सगळी कडून एकसारखेच दिसून येतं. म्हणून हे घरातील वास्तू दोषाला दूर करण्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे.
 
* प्रत्येक सणासुदीला घराच्या मुख्य दारावर शेंदुराने शुभ-लाभ काढण्याची पद्धत आहे. 
 
* मुख्य दारावर हळदीचे ठिबके दिल्यानं घरात सौख्य आणि समृद्धी येते. हळद ही शुभतेचे प्रतीक मानली गेली आहे. पिवळा रंग ही बृहस्पती किंवा गुरुचा घटक आहे. जे सौख्य आणि समृद्धीला दर्शवितो. या मुळे घरातील रोगांचा नायनाट होतो. प्रत्येक घरासाठी हे चिन्ह काढणं आवश्यक आहे.
 
* वास्तुशास्त्रानुसार मीनच्या प्रतीक चिन्हांना घरातील उत्तर दिशेस ठेवावं. असे केल्यास धन-लाभ होतो. जर आपणांस मीनचे प्रतीक चिन्हे ठेवायचे नसल्यास आपण फिश एक्वेरिअम देखील ठेवू शकता. या मुळे घरात पैसे वाढतात. 
 
* ॐ हे सृष्टीचे निर्माते परमपिता ब्रह्माचे प्रतीक आहे. ॐ चे चिन्ह घरात ठेवल्यानं घरात एक विशिष्ट प्रकाराची ऊर्जेचा प्रसरण होतो जी घरातील रोगांचा निर्माण करणारी ऊर्जेचा नायनाट करते.
 
* शास्त्रांनुसार श्री गणेश हे आराध्य देव आहे सर्वप्रथम उपासना त्यांची केली जाते. घराच्या मुख्य दारावर त्यांचे चित्र लावल्यानं घरात सौख्य आणि समृद्धी नांदते.
 
* घराचे मुख्य दार दक्षिणमुखी असल्यास दारांवर पंचमुखी मारुतीचे चित्र लावावे.
 
* दाराच्या मधोमध क्रिस्टलचे बॉल्स लोंबकळत ठेवल्यानं आपण घरातील सकारात्मक ऊर्जेला वाढवू शकता.