गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

धनतेरस वास्तु टिप्स, कोणत्या दाराच्या दिव्यात काय घालावे जाणून घ्या

आपले घर कोणत्या दिशेला आहे आणि त्याचे मुख्य दार कोणत्या दिशेला आहे हे लक्षात घेऊनच आपण काही विकत घ्यावे आणि दारावर कोणते दिवे लावावे या साठी जाणून घेऊ या अशा सामान्य युक्त्या ज्या मुळे आपल्याला धनतेरसचा शुभ लाभ मिळतील. पुढील टिप्स हे मान्यतेवर आधारित आहे.
 
1 जर आपल्या घराचे मुख्य दार आग्नेय कोनात आहे तर आपण चांदीचे सामान आवर्जून विकत घ्यावे. आपली क्षमता असल्यास आपण हिरा देखील विकत घेऊ शकता आणि दारावर दिवा लावताना त्यात कवडी नक्की टाका.
 
2 जर आपले घराचे मुख्य दार दक्षिण दिशेला आहे तर आपण सोनं किंवा तांब्याने बनलेले सामान विकत घ्या. मुख्य दारावर दिवा लावाल तर त्यात मोहऱ्या आवर्जून घाला.
 
3 जर आपल्या घराचे मुख्य दार नैऋत्य दिशेला आहे तर आपण चांदी किंवा तांब्याच्या वस्तू विकत घ्या आणि दारावर दिवा लावताना त्यात लवंगा घाला.
 
4 जर आपल्या घराचे दार पश्चिम दिशेला आहे तर आपण चांदीच्या वस्तू विकत घ्या आणि घराच्या मुख्य दारावर दिवे लावताना त्यामध्ये एक किशमिश किंवा बेदाणे जरूर घाला.
 
5 जर मुख्य दार वायव्य कोनाच्या दिशेला आहे तर चांदी किंवा मोती विकत घ्या आणि दिव्यात थोडी खडी साखर घाला.
 
6 जर घराचे मुख्य दार उत्तरे दिशेला आहे तर सोनं, पितळ विकत घ्या किंवा लक्ष्मी-नारायणाचे चित्र आवर्जून घ्या आणि आपल्या मुख्य दारावर दिवा लावताना त्यात एक वेलची घाला.
 
7  मुख्य दार ईशान्य दिशेला असल्यास सोनं, पितळ विकत घ्या आणि लक्ष्मी-गणेशाची मूर्ती जरूर विकत घ्या आणि मुख्य दाराशी दिवा लावताना त्या मध्ये चिमूटभर हळद आवर्जून घाला.
   
8 जर आपल्या घराचे मुख्य दार पूर्वीकडे असल्यास तर आपल्याला सोनं किंवा तांबा विकत घ्यायला हवे आणि मुख्य दारावर दिवा लावताना त्यामध्ये थोडं कुंकू घाला.
 
9 या व्यतिरिक्त या दिवशी नवी झाडू आणि सुपली खरेदी करून त्याची पूजा करावी. क्षमता असल्यास तांबे, पितळ, चांदीची नवीन भांडी आणि दागिने विकत घ्या. शुभ मुहूर्त बघून आपल्या व्यावसायिक जागेवर नवीन गादी अंथरा किंवा जुन्याच गादीला स्वच्छ करून परत ठेवावं. नंतर त्या वर नवीन कापड घाला.
 
10 या शिवाय मंदिर, गोठे, नदीकाठी, विहीर, तलाव, बागेत देखील दिवे लावावे. धनतेरसच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. संध्याकाळ नंतर तेरा दिवे लावून तिजोरी मधील कुबेरांची पूजा करा.