दिवाळीसाठी मुख्य दारावर वास्तुनुसार लावा तोरण, लक्ष्मी आकर्षित होईल

Last Modified बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:21 IST)
सनातन धर्मात भगवान गणेश आणि देवी महालक्ष्मीच्या आनंदाचा सण म्हणजे आश्विन अमावास्येला ला साजारा होणार सण दिवाळी. भगवान श्री विष्णूंच्या प्रिय असणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठीची तयारी बऱ्याच दिवसा पूर्वी सुरू होते. घर आणि व्यावसायिक संस्थान, कार्यालयाची स्वच्छता, रंग-रंगोटी केली जाते. त्या नंतर आपल्या घराला सजविण्याचे काम सुरू होते. दिवाळीवर देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी विविध प्रकाराचे तोरण मुख्य दारावर लावले जातात. जर आपण वास्तुच्या काही नियमांना लक्षात ठेवून रंग आणि दिशेनुसार तोरण बांधले, तर ते आपल्याला शुभ आणि चांगली फळ देतात आणि आनंद, यश आणि समृद्धी आपल्या जीवनात दार ठोठावते.

* तोरणाने आनंद येईल -
मुख्य दारावर बांधल्या जाणाऱ्या तोरणाला बंधनवार असे ही म्हणतात. देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी दारावर हे बांधणे शुभ मानतात. हे बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तोरण आपण ताज्या फुलांचे, प्लॅस्टिकच्या फुलांचे किंवा धातूचे देखील बनवू शकता. आजकाल बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाइनचे तोरण मिळतात. तोरणांची निवड घराच्या दिशेनुसार, रंग आणि आकार लक्षात घेऊन लावल्याने नशीब वाढतं.

* पूर्वीकडे घराचे मुख्य दार असल्यास -
जर आपल्या घराचे दार पूर्वमुखी असल्यास तर हिरव्या रंगाचे फुलांचे आणि पानाचे तोरण लावणं सुख आणि समृद्धीला आमंत्रण देत. या दिशेत ताज्या आंब्याच्या आणि अशोकाच्या पानाचे तोरण लावल्यानं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि लक्ष्मीची कृपा मिळते.

* उत्तरेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
धनाची दिशा उत्तरेच्या मुख्य दारासाठी निळे किंवा आकाशी रंगांच्या फुलांचे तोरण लावावे. जर आपल्याकडे ताजे फुले नसल्यास आपण प्लस्टिकच्या फुलांचा वापर करू शकता. पण लक्षात ठेवा की फुले आणि पाने तुटलेले किंवा घाणेरडे नसावे. हे नेहमीच नकारात्मकता वाढवतात.

* दक्षिणेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
जर घराचे मुख्य प्रवेश दार दक्षिणेकडे असल्यास तर लाल, नारंगी किंवा याचा सम रंगाने असलेले तोरण बांधावे. असे केल्याने घरात धनागमन होत आणि मान सन्मानात वाढ होते.

* पश्चिमेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
घराचे मुख्य दार पश्चिमेकडे असल्यास मुख्य दारासाठी पिवळे, सोनेरी किंवा फिकट निळ्या रंगाच्या फुलांचे तोरण दारावर लावणं लाभ आणि प्रगतीस मदत करतं. लक्षात ठेवा की पूर्वी आणि दक्षिणे कडे असणाऱ्या दारावर कोणत्याही धातूचे तोरण लावू नये. पश्चिम आणि उत्तरे कडील दारावर धातूंचे तोरण लावू शकतो. अशा प्रकारे उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशेत बनलेल्या प्रवेश दारावर लाकडाचे तोरण लावू शकतो, पण पश्चिम दिशेला लाकडाचे तोरण लावणे टाळावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?
१. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता ...

अशा घरात सुखी राहतं कुटुंब

अशा घरात सुखी राहतं कुटुंब
सुखी संसारासाठी मनुष्याच्या जीवनात अनेक गोष्टीचं महत्त्वं असतं. चाणक्य यांनी आपल्या ...

Vishwakarma Jayanti विश्वकर्मा पूजा विधी

Vishwakarma Jayanti विश्वकर्मा पूजा विधी
विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा ...

गुरु पुष्य योग : हे उपाय करा, धन संबंधी समस्या दूर होतील

गुरु पुष्य योग : हे उपाय करा, धन संबंधी समस्या दूर होतील
गुरु पुष्य योग असेल त्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन संबंधी समस्या ...

भीष्म द्वादशी कथा Bhishma Dwadashi Story

भीष्म द्वादशी कथा Bhishma Dwadashi Story
भीष्म द्वादशी बद्दल प्रचलित कथेनुसार, राजा शंतनू यांची राणी गंगा देवव्रत नावाच्या ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...