1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 13 मे 2024 (08:45 IST)

एक दमडी खर्च न करता दूर करा वास्तू दोष, आजच करा हे उपाय

how to get rid of vastu dosh
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेकदा अनेक प्रकारचे उपाय सुचवले जातात. या उपायांमुळे घराची तोडफोड करावी लागते आणि मोठा पैसाही खर्च होतो. मात्र आपल्याला हे माहित आहे का की वास्तू दोष दूर करण्यासाठी नेहमी तोडाफोडी करणे किंवा खर्च करणे आवश्यक नसते. काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही सर्व वास्तू दोष दूर करू शकता. अशाच काही वास्तु टिप्स जाणून घ्या-
या उपायांनी दूर होतील वास्तू दोष 
 
गणेश वास्तू दोष दूर करतील- 
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला अगदी वर गणपतीची मूर्ती स्थापित करा. या मूर्तीची स्थापना एखाद्या शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर करावी. याने घरातील सर्व प्रकारचे वास्तू दोष दूर होतात.
 
देवघरात दिवा लावा- सर्व घरांमध्ये एक देवघर असतं जिथे त्या घरात राहणारे लोक दररोज पूजा करतात. तेथे दररोज पूजा करावी आणि सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी दिवे लावावेत. दिवा शक्य नसेल तर कापूर जाळावा. याने काहीही न करता सर्व वास्तू दोष दूर होतात.
 
फुलांच्या रोपातून सकारात्मक ऊर्जा मिळेल-
वास्तू दोष दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या घरात स्वच्छता राखणे. यासोबतच घरात सुंदर आणि सुगंधी फुले लावा. तुम्ही गुलाब, चमेली, मोगरी, झेंडू, कमळ इत्यादी फुलझाडे लावू शकता. घराबाहेर सुंदर फुलांची रोपे लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.