1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (13:40 IST)

घरात गायीचे चित्र किंवा मूर्ती लावा, सुख-सौभाग्य वाढेल

वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होऊ शकतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. भगवान श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे. गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे. सर्व देवी-देवता गायीमध्ये वास करतात. सर्व वेद देखील गायींमध्ये स्थापित आहेत. दूध, तूप, शेण किंवा गोमूत्र यांसारख्या गायीपासून मिळणाऱ्या सर्व घटकांमध्ये सर्व देवतांचे घटक साठवले जातात. पौराणिक कथेनुसार, देव आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय कामधेनू होती.
 
कुठे ठेवावे गायीचे चित्र किंवा मूर्ती
पूर्व-दक्षिण-पूर्व भागात कामधेनू गाय ठेवल्याने संघर्ष, दु:ख आणि चिंतेसाठी जबाबदार असलेल्या शक्तींचे फलदायी उर्जेमध्ये रूपांतर करून तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.
 
वास्तूच्या मतानुसार वासराला दूध पाजणारी गाय घरात ठेवल्याने योग्य संतती होण्याची शक्यता निर्माण होते. जोडप्याने गायीचे हे चिन्ह आपल्या बेडरूममध्ये अशा प्रकारे ठेवावे की त्यांची नजर पुन्हा पुन्हा त्यावर पडेल.
 
वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी सवत्सा अशी गाय बांधावी, म्हणजे ज्या गायीला वासरू असेल. गाय जेव्हा नवजात वासराला चाटते तेव्हा तिचं फॅन जमिनीवर पडतं ज्यामुळे ती जागा पवित्र होते आणि त्यातील सर्व दोष आपोआप दूर होतात.
 
ज्या घरांमध्ये गायीची सेवा केली जाते. अशा घरांमध्ये, सर्व अडथळे दूर होतात. विष्णु पुराणानुसार श्रीकृष्ण पुतणाच्या दुग्धपानामुळे घाबरले तेव्हा नंद दांपत्याने गाईची शेपूट वळवून त्यांची दृष्ट काढली आणि भीती दूर केली.
 
कोणत्याही मुलाखतीला जाताना, उच्चपदस्थांना भेटायला जाताना गायीला हिरवा चारा खाऊ घातल्याचे वास्तूमध्ये खूप महत्तव आहे.
 
वास्तूनुसार आपल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी नाण्यांच्या ढिगाऱ्यावर गाय बसवणे खूप शुभ मानले जाते. येथे ठेवल्यास अपेक्षेप्रमाणे यश आणि समृद्धी मिळते.
 
कामधेनू गाईची मूर्ती घरी किंवा ऑफिसमध्ये लावणे खूप फायदेशीर ठरू शकते कारण यामुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतात आणि त्याची सहनशीलता वाढते, ज्यामुळे व्यक्ती योग्य निर्णय घेण्यास सक्षम होते.
 
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला राधा-कृष्ण बासरी आणि त्यांच्या मागे बांधलेली गाय यांचे चित्र लावा.
 
स्वत: भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, जो प्राणी गायीची पूजा करतो, ती पूजा मी स्वतःची पूजा मानतो. तसेच गाईच्या खुरातून निघणारी धूळ शरीरावर लावणे खूप फायदेशीर मानले जाते, ते लावल्याने नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.