शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (00:10 IST)

घरात लावा हे झाडं आणि बघा त्याचे सकारात्मक परिणाम

घरात झाडं लावण्याची प्रथा जुन्या काळापासून सुरू आहे. कधी वास्तूसाठी तर कधी घरात सुख-शांतीसाठी. लोक वास्तूच्या उपायांना उपयोगात आणून आपले जीवन खुशहाल घालवतात तर तुम्ही का नाही? वास्तूत प्रत्येक समस्यांचे समाधान आहे.  
 
बर्‍याच वस्तूंना वस्तूंप्रमाणे योग्य जागेवर ठेवल्याने त्याचे अनुकूल परिणाम मिळतात. यात घरात लावलेल्या झाडांचे बरेच योगदान असतात. तर आता जाणून घेऊ काही झाडांबद्दल ज्यांना तुम्ही घरात लावून आपल्या जीवनात आनंद मिळवू शकता.   
1. पहिलं झाड जासवंदा(गुडहल)चे आहे. या झाडाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी असतो. हनुमानाला जासवंदाचे फूल अर्पित केल्याने मंगळ ग्रह प्रसन्न होतो. रोज पूजा केल्याने पारिवारिक सदस्यांच्या प्रगतीत वाढ होते.  
 
2. लग्नात येणार्‍या अडचणी किंवा घरातील सुख-शांतीला कायम ठेवण्यासाठी घराच्या मागच्या भागात केळीचे झाड लावायला पाहिजे. रोज या झाडाची पूजा केल्याने मनोवांछित फळांची प्राप्ती होते.    
 
3. तुळशी एक पवित्र पौधा आहे. यात औषधीय गुण देखील असतात. घरात या रोपाला लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. रोज तुळशीपुढे दिवा लावल्याने शुक्र ग्रह बलवान होतो. 
 
4. घरात डाळिंबाचा पौधा लावल्याने राहू केतूचे नकारात्मक प्रभाव, तंत्र-मंत्र इत्यादी प्रभाव कमी होण्यास मदत मिळते. जर डाळिंबाच्या फुलाला मधात घालून प्रत्येक सोमवारी महादेवाला अर्पित केले तर सर्व प्रकारांच्या कष्टांपासून मुक्ती मिळते.   
 
त्या शिवाय तुम्ही मनीप्लांट देखील लावू शकता हे आर्थिक स्थिती उत्तम ठेवण्यास मदत करेल.