सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

राधा-कृष्ण यांचे आपल्या जीवनात इतकं महत्व आहे म्हणून आजच लावा फोटो

* राधा-कृष्ण प्रेम
राधा-कृष्ण यांच्यातील प्रेम सर्वांसाठी आदर्श आहे. 
राधा-कृष्णाची मूर्ती किंवा फोटो डोळ्यासमोर असल्यास मनात जीवन साथीदारासाठी प्रेम वाढतं. 
राधा-कृष्णाप्रमाणे पती-पत्नी यांच्यात निःस्वार्थ प्रेम निर्माण झाले तर वैवाहिक जीवनातील अनेक समस्या दूर होतील.
 
* फोटो कुठे लावायला हवा?
प्रेमाचे प्रतीक राधा-कृष्णाची मूर्ती किंवा सुंदर चित्र बेडरूममध्ये असावे. 
चित्राला लाल रंगाची फ्रेम असल्यास उत्तम. 
अशाने पती- पत्नी यांच्यातील समस्या दूर होतील. 
बेडरूममध्ये फोटोची जागा अशी असावी की येता-जाता त्यावर आपोआप लक्ष जाईल.
 
* या गोष्टींकडे देखील लक्ष द्या
आनंदी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकमेकांचा विश्वास भंग करू नये. 
जुन्या चुका पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी. 
जुन्या गोष्टींवर वारंवार चर्चा करू वाद घालू नये. 
बेडरूममध्ये कोणत्याही तिसर्‍या व्यक्तीबद्दल बोलू नये. 
एकमेकांचा सन्मान द्यावा.