शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (09:11 IST)

वास्तुशास्त्राचे नियम

प्राचीन ऋषी-मुनी व शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तु रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तू देवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन केले पाहिजे. या शास्‍त्रांच्या विपरित वास्तु बांधल्यास तीथ रहाणार्‍यांना त्रास होतो. अशावेळी घरात जे वास्तु संमत नाही त्यात बदल करून ती वास्तु रहाण्यास अनुकूल बनवू शकता. त्यासाठी खालील उपाय करा.
 
घरापुढे, मागे, आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरा.
 
घरासमोर कचर्‍याचा ढिगारा असेल, न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते लगेचच साफ करायला हवे. घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले.
 
किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल तर आणि ती जागा बदलणे शक्य नसले तर जेवण करताना
तोंड उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे.
 
घरातील नैऋत्य कोपरा (दक्षिण-पश्चिम) कधीही रिकामा ठेवू नये. तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे.
 
घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर, पूर्व किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व कोपरा) दिशेला असेल तर ईशान्य कोपर्‍यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे.