शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2017 (14:32 IST)

वास्तू : खेळणी दान करा आणि घरात आनंद आणा

घरातील वातावरण आनंदी असावे असे सर्वांचीच इच्छा असते, पण बर्‍याच वेळा आम्ही स्वत:ला एकदम अडचणीत सापडतो. पण असे का होते याचे कारण जाणून घेणे फारच आवश्यक आहे. वास्तु शास्त्रात सांगण्यात आलेल्या काही गोष्टींचे लक्ष्य ठेवले तर सर्व अडचणींवर तुम्ही मात देऊ शकता. तर त्या कोणत्या गोष्टी आहे जाणून घेऊ.  
 
जर तुमच्या मिळकतीत सारखे सारखे व्यवधान येत असेल तर घरात डाव्या बाजूला एखादं भारी वस्तू ठेवा.  
 
घरातील छपरावर एका भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी आणि तृणधान्ये ठेवा ज्याने घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहील.   
 
पुस्तकं, खेळणे आणि भांडे जे प्रयोगात येत नसतील त्यांना विकण्यापेक्षा त्याचे दान करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात संपन्नता वाढेल. 
 
जनावरांच्या पाणी पिण्याचे तुटके फुटके भांडे कधीही दारासोमर ठेवू नये.  
 
जर तुमच्या आयपेक्षा खर्च जास्त होत असेल तर एक आरसा असा लावा की त्याचा प्रतिबिंब तिजोरीवर पडायला पाहिजे. 
 
घराच्या मुख्य प्रवेश दारावर ऊं ची आकृती काढा किंवा शुभ-लाभ लिहा. यामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहण्यास मदत मिळेल.  
 
घरात जर क्लेश होत असेल तर ड्राइंग रूममध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवा. पायर्‍यांच्या खाली कधीपण कबाड जमा होऊ देऊ नका.