शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (09:51 IST)

काय सांगता, स्नानघर आणि स्वछतागृह एकत्र नसावं, चंद्रदोष लागतो

वास्तुशास्त्रात दिशांचे फार महत्व आहे. सध्याच्या काळात स्नानघर आणि स्वछतागृह किंवा शौचालये एकत्र बांधण्यात येतात. कारण एकच जागेचा अभाव. पण आपणास हे माहित आहे का की यामुळे वास्तू दोष लागतो. यामुळे कुटुंबियातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरी जावं लागतं. खरं तर हे घराच्या खुशाली, समृद्धी आणि आरोग्यावर परिमाण करतं. तसेच मुलांचे करियर आणि कौटुंबिक संबंध देखील खराब होतात. पती-पत्नी मधील मतभेदाची वाद-विवादाची स्थिती उद्भवते.
 
या आहे योग्य दिशा - 
वास्तुशास्त्रानुसार 'पूर्वम स्नान मंदिरम' म्हणजे घराच्या पूर्वीकडे स्नानगृह असावं. आणि 'या नैऋत्य मध्ये पुरीष त्याग मंदिरम' म्हणजे नेहमी दक्षिण आणि नेऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला शौचालय असावं. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा विसर्जनेसाठी उत्तम मानली गेली आहे. म्हणून या दिशेला शौचालय असणं वास्तूच्या दृष्टीने योग्य असल्याचे म्हटले आहे.
 
म्हणून एकत्र नसावं - 
स्नानगृह आणि शौचालय एकाच दिशेला असल्यानं वास्तुनियम मोडला जातो. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार स्नानगृहात चंद्राचा आणि शौचालयात राहूचा वास असतो. जर स्नानगृह आणि शौचालय एकत्र असले तर चंद्रमा आणि राहू देखील एकत्र येतील आणि चन्द्रमाला राहूचे ग्रहण लागतात म्हणजे चंद्रमा अशुभ होतो.
 
चंद्र अशुभ झाल्यानं अनेक दोष लागतात, मानसिक त्रास वाढतो. चंद्र हा मनाचा आणि पाण्याचा घटक आहे आणि राहू हा विषाचा घटक आहे. या दोघांच्या संयोजनामुळे पाणी विषारी होतं. ज्याचा प्रभाव माणसाच्या मन आणि शरीरावर पडतो. शास्त्रात चन्द्राला सोम म्हणजे अमृत म्हटलं आहे आणि राहू ला विष मानले गेले आहे. हे दोन्ही विरोधाभासी आहे. म्हणून स्नानगृह आणि शौचालय एकत्र असल्यामुळे कुटुंबात भेद वाढतात. लोकांमध्ये सहनशीलता कमी होते. मनात एकमेकांसाठी राग उद्भवतो.
 
काय करावं -
* नकारात्मक उर्जेला दूर करण्यासाठी आपण इथे एका काचेच्या भांड्यात किंवा बाटलीत सेंधव मीठ किंवा मिठाचे खडे ठेवा. दर पंधरा दिवसांनी हे मीठ बदलून घ्या. मीठ आणि काच दोन्ही राहू ग्रहाशी निगडित असतात जी राहूच्या नकारात्मक प्रभावाला कमी करतं. राहू नकारात्मक ऊर्जा आणि जंत जे संसर्ग देतात त्याचे घटक मानतात. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर वाईट परिणाम करतं.
 
* लक्षात ठेवा की स्नानगृहाच्या वापर करून त्याला घाण ठेऊ नका. स्नानगृह नेहमी कोरडं आणि स्वच्छ ठेवा.
 
* जर आपल्या घरात स्नानगृह आणि शौचालय एकत्र आहे तर या दोघांच्या मध्ये एक पडदा लावून द्या. 
 
* शौचालयाची खिडकी किंवा दार दक्षिण दिशेला नसावं. वास्तू शास्त्रानुसार शौचालयात सिरॅमिक फरश्या वापराव्यात आणि ईशान, पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे फरशीचा उतार असावा.