testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तुनुसार बाथरूमची योग्य दिशा कोणती!

bahtroom
वास्तुनुसार 'बाथरूम/टॉयलेट्स', 'टॉयलेट्स ईशान्यदिशेस, आग्नेयस, नैऋत्यकडे कोपर्‍यात किंवा घराच्या मधोमध नसावी. एकत्रित बाथरूम किंवा टॉयलेट ईशान्येकडच्या भागात कालत्रयी नसावी.
पाण्याचा पाइप, शॉवर किंवा बाथटब वगैरे बाथरूमच्या ईशान्य भागात ठेवण्यात यावे. टॉयलेट मधील नळ पूर्वेस, उत्तरेकडे किंवा ईशान्य या दिशेस असावे.

बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीवर हिरवा, नीळा किंवा पिवळा रंग दिलेला असावा. पूर्वेकडे बाथरूम असलेले चांगले असते, त्यायोगे सूर्याचा प्रकाश आंघोळ करणार्‍यास लाभतो.

बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये वॉश बेसिन पश्चिमेकडे असावे. कुटुंबातील प्रत्येक सभासदासाठी निराळा टॉवेल असावा.

प्रात:काळी आंघोळ करताच सूर्याचे दर्शन घेणे शुभलक्षणी असते. टॉयलेटच्या तळभागाचा उतार असा असावा की पाणी वाहून पूर्वेस, उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेकडे निघून जाईल.

टॉयलेटमध्ये गीजर आग्नेयेस किंवा वायव्य दिशेकडे असावे. टॉयलेटशी निगडीत सांडपाण्याचा पाइप घराच्या उत्तरेस किंवा पूर्वेकडे असावा. सेप्टिक टैंक वायव्येस किंवा उत्तरेकडे असावा परंतु दक्षिणेस किंवा पश्चिमेकडे नसावा.यावर अधिक वाचा :