Vastu Tips : देवघर कुठे असावे?
* देवघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेत नसले पाहिजे.
* देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असले पाहिजे.
* देवघराजवळ किंवा वरती शौचालय नसले पाहिजे.
* स्वयंपाकघरात देवघर असणे वास्तूप्रमाणे योग्य नाही.
* देवघरातील देव एकमेकापासून किमान 1 इंच लांब ठेवावे.
* घरात एकाच देवाचे दोन चित्र किंवा मूर्ती असल्यास त्यांना एकमेकासमोर अजिबात ठेवू नये.
* एक घरात अनेक लोक राहत असले तरी देवघर एकच असलं पाहिजे.
* एकाच घरात एकापेक्षा अधिक देवघर असल्यास शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागतं.
* जिन्याखाली किंवा तळघरात देवघर नसावं. अशा अवस्थेत मनोभावे पूजा केली तरी त्याचा लाभ होत नाही उलट समस्या निर्माण होतात.
* झोपताना हे लक्षात असू द्यावं की कोणाचेही पाय देवघराच्या दिशेला नसावे. देवाकडे पाय करून झोपणे योग्य नाही.