शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (00:01 IST)

घरात बदल न करता, फक्त या 5 VASTU TIPSने दूर होईल निगेटिव्ह एनर्जी

घर एक अशी जागा आहे जिथे तुमच्या आठवणी जुळलेल्या असतात आणि सर्वांसाठी हे फारच महत्त्वपूर्ण आहे. हेच कारण आहे की आम्ही आमच्या घराला प्रत्येक प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. वास्तूनुसार घराला निगेटिव्ह एनर्जीपासून दूर ठेवण्यासाठी काही बदल करावे लागतात, जसे किचनच्या दिशेत बदल.  
 
पण आम्ही तुम्हाला असे काही वास्तू टिप्स देत आहोत ज्याने बगैर काही बदल करता तुम्ही घरापासून निगेटिव्ह एनर्जीला दूर ठेवू शकता. वाचा काय आहे त्या टिप्स:
 
घराच्या मुख्य दाराबाहेर नेम प्लेट जरूर असायला पाहिजे. असे म्हटले जाते की याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येईल आणि तुमच्या जीवनात बरेच चांगले प्रसंग घडून येतील.  
 
घरात रोज सकाळ संध्याकाळ देवघरात दिवा लावायला पाहिजे. वस्तूनुसार म्हटले जाते की यामुळे घरात नकारात्मक एनर्जी दूर होते आणि घरातील वातावरण शुद्ध होतं.  
 
घरातून निगेटिव्ह एनर्जीला दूर करण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात लिंबू घालून ठेवा आणि प्रत्येक शनिवारी याला बदलून घ्या. वस्तूनुसार असे केल्याने घरातून नकारात्मक एनर्जी दूर होते.  
 
किचनमध्ये औषध नाही ठेवल्या पाहिजे. किचनमध्ये जर औषध ठेवले तर निगेटिव्ह एनर्जी आकर्षित होऊन घरात प्रवेश करते.  
 
घरात रोज मंत्रांचे उच्चारण आणि काही वेळेसाठी मेडिटेशन केल्याने घरातून निगेटिव्ह एनर्जी दूर होते.