testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

व्यापार सुरू करण्याआधी अमलात आणा ह्या वास्तू टिप्स

आपला व्यवसाय सुरू करणे हे सर्वांचे स्वप्न असत. सर्वांनाच वाटतकी त्यांचा व्यवसाय चांगला चालायला पाहिजे. त्यासाठी लोक वास्तू पूजा, ग्रह-नक्षत्र सारख्या गोष्टी बघतात. जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करत असाल आणि त्यात तुम्हाला कुठलीही अडचण नको असेल तर अमलात आणा ह्या वास्तू टिप्स :
1. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या कामासाठी नवीन प्लॉट किंवा जागा खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की दुकानाचे मुख्य दार पूर्व किंवा उत्तर दिशेत उघडेल असे पाहिजे. असे केल्याने सतत सकारात्मक ऊर्जा राहते.

2. वास्तूनुसार दुकानाचा मालक किंवा मॅनेजरला दुकानाच्या दक्षिण-पश्चिम दिशेत बसायला पाहिजे. याने तुमचा बिझनेस उत्तम चालेल.

3. वास्तूनुसार दुकानाचे कॅशकाऊंटर नेहमी दक्षिण किंवा पश्चिमेकडील भिंतीकडे असायला पाहिजे. या दिशेत ठेवल्याने तुमच्या लॉकरमध्ये पैसा कायमस्वरूपी राहील.

4. दुकानाच्या उत्तर-पूर्व दिशेत देवाचे फोटो लावायला पाहिजे. असे केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहते.

5. व्यावसायिक भवनाच्या गेटसमोर कुठलेही खांब किंवा मोठे झाडं नसावे.

6. वास्तूनुसार विजेचे यंत्र ठेवणे किंवा स्विच बोर्ड लावण्यासाठी दुकानाचा दक्षिण-पूर्व भाग उत्तम मानला जातो.


यावर अधिक वाचा :