शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वापरा निळ्या रंगाची बादली

वास्तूप्रमाणे घरात योग्य रंगाचा वापर केल्याने सुख- समृद्धी वाढते. बाथरूम आपल्या घरातील एक महत्त्वाचा भाग असून तिथे वास्तूच्या नियमांचा पालन केल्यास संकट दूर होतात.
 
* निळा रंग सुख आणि शुभ असल्याचा प्रतीक आहे, म्हणून बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे शुभ असतं. परंतू बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नये. बादली नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेली असावी. असे केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी राहते.

* बाथरूममध्ये आरसा कधीही दारासमोर नसावा. कारण जेव्हा जेव्हा बाथरूमचे दार उघडतं तेव्हा तेव्हा नेगेटिव एनर्जी बाथरूममध्ये प्रवेश करते. अशात दारासमोर आरसा असल्यास ती एनर्जी आरशाला आदळून पुन्हा घरात प्रवेश करेल.
पुढे वाचा आणखी काही टिप्स...

* वारंवार बाथरूमचा वापर होत असला तरी त्याचे दार उघडे ठेवू नये.
* घरात पाण्याचा दुरुपयोग केल्याने वास्तू दोष लागतो. याने धन आणि आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरा जावं लागतं.
 
* बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवावे.