रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

वास्तुशास्त्रनुसार घराची बाल्कनी कशी असावी

Vastu Tips for Balcony- तुमचा फ्लॅट असो किंवा घर त्यात बाल्कनी वास्तुशास्त्रनुसार असणे गरजेचे असते. कारण बाल्कनीमधून हवा आणि प्रकाश येतो तर तिथुन रोग देखील येऊ शकतात. जर बाल्कनीची वास्तु बरोबर नसेल तर व्यवस्थित करून घ्यावी. किंवा वास्तु टिप्स अवलंबवून वास्तुदोष दूर करू शकतात. 
 
1. जर तुमची बाल्कनी वायव्य, उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला असेल तर उत्तमच आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या दिशांमध्ये असेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. जर घर पश्चिममुखी असेल तर उत्तर किंवा पश्चिम दिशेला बालकनी असावी. घर उत्तरमुखी असेल तर बालकनी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. जर दक्षिण मुखी घर असेल तर बाल्कनी पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावी. 
 
2. बाल्कनी सुंदर आणि अखंडित असावी. म्हणजे तिची रैलिंग किंवा वॉल तुतलेला नको बालकनी तुटलेली किंवा ख़राब असायला नको .
 
3. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात थंड हवा येण्यासाठी घरात बाल्कनी पेक्षा चांगली जागा कोणतीच नाही. म्हणून बाल्कनीला सुंदर आणि अट्रेक्टिव बनवा. 
 
4. बाल्कनीतील वास्तुदोष दूर करण्यासाठी बाल्कनीत रोप लावली जातात. तसेच वॉल प्लांटने तुम्ही बाल्कनीची शोभा वाढवू शकतात. 
 
5. जर बाल्कनीत जागा कमी असेल तर कुंडयांमध्ये रोप जरूर लावावे. यामुळे हवा चांगली राहिल तसेच हिरवळ राहिल. तसेच रंगीबेरंगी फुलांनी तुमच्या बाल्कनीला सजवा. तसेच मोठया कुंड्या किंवा मोठे झाडे बाल्कनीत लावू नये. 
 
6. बाल्कनीमध्ये जून सामान, भंगार, जुने फर्नीचर, न्यूज पेपर या वस्तु कधीच ठेऊ नये. 
 
7. उत्तर दिशेला जर बाल्कनी असेल तर तुमच्यासाठी धन आणि समृद्धीचे द्वार उघडतात. दक्षिण दिशेला असल्यास रोग आणि शोक वाढण्याची शक्यता असते. कारण ही यमाची दिशा असते. 
 
8. घराची दक्षिण दिशा आणि नैऋत्य दिशा शुभ नसते. जर या दिशेला बाल्कनी असेल तर तिथे जाड शेड लावा किंवा जास्त रोप लावावीत.  
 
9. बाल्कनीचे छत तिरपे म्हणजे झोपडीच्या आकाराचे असावे जे उत्तर किंवा पूर्व दिशेला झुकलेले असावे. 
 
10. बाल्कनीच्या भिंतींना हल्कासा निळा किंवा पिवळा रंग द्यावा जर पांढरा रंग दिला असेल तर चांगलेच आहे. 
 
11. बाल्कनीमध्ये बसण्यासाठी पश्चिम दिशेला छोटेसे लकडाचे फर्नीचर असावे. हे फर्नीचर जास्त मोठे नको.
 
12. तुम्हाला हवे असल्यास उत्तर-दक्षिण दिशेकडे झोका लावू शकतात. 
 
13. जर तुमची बाल्कनी मोठी असेल तर तिथे छोट्याश्या कारंजा देखील लावू शकतात. 
 
14. बाल्कनीमध्ये हलका पांढरा प्रकाशाचा उपयोग करावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik