testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तुशास्त्रात असतात 6 छंद, जाणून घ्या!

वास्तुशास्त्रानुसार घर बांधणे एक शास्त्रीय काम आहे. त्याला कलेचे अधिष्ठान आहे. प्रत्येक कलेचा एक छंद असतो. छंद म्हणजे पद्यमय रचना. शास्त्रीय संगीतात छंद योजना, सुर, स्वर, लय यापासून रागाची उत्पत्ती होते व त्याचा रसपूर्ण आनंद आपल्यालामिळतो. वेगवेगळ्या छंदांपासून वेगवेगळ्या रागाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे घरबांधणीतही प्रत्येक घर एक वेगळ्याच छंदात आकार घेते.

यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे घराची आतली रचना, मुख्य दरवाजा, ब्रह्मस्‍थळे झोपायची खोली, देवघर, स्वंपाकघर हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच घराचे बाह्यरूप (Front Elevation) ही तेवढेच महत्वाचे आहे कारण यावरून घराचे चरित्र, राहणार्‍याची मानसिकता, विचार व वास्तुतज्ज्ञाची समयसूचकता दिसते.

वास्तुशास्त्रानुसार 6 प्रकारचे छंद असतात : 1. मेरू 2. खंडमेरू 3. पताका 4. सूची 5. उद्दीष्ट 6. नष्ट. या नावानुसार त्याची (घराची) आकृती असते. जसे मेरू हा याच नावाच्या पर्वताप्रमाणे, खंडमेरू अर्ध्या पर्वताप्रमाणे किंवा खंडित पर्वताप्रमाणे असतो. पताका छंद पताकांसारखा समान एका रेषेत असतो. रूची छंदात वास्तू एकाआड एक सूचीत असते. उद्दिष्ट व नष्ट हे छंद स्थापत्यशास्त्रज्ञ आपल्या विचाराने छंदांना एकत्र करून बनवतो.

वास्तुतज्ज्ञाची लक्षणे :-
समरांगण सूत्रधारानुसार एका स्थापत्याला शास्त्र, कर्म, क्रिया, प्रज्ञाशील तसेच आचरणाने शीलवान असावे लागते. याच्या विश्लेषणावरून हे लक्षात येईल की वास्तुतज्ज्ञाला शास्त्र माहीत हवे. कर्म म्हणजे घर बांधण्याचे प्रयोजन, वास्तु-नियोजन, पदविन्यास याच्या प्रमाणांची माहिती हवी. तसेच प्रज्ञा म्हणजे स्वत:चा विवेकही त्याने वापरावा. शास्त्रांचे व्यावहारीक ज्ञान, शीलवान म्हणजे त्याचे आचरण शुद्ध असून तो राग, लोभ, मद, मोह, मत्सरापासून मुक्त हवा. यानुसार वास्तुतज्ज्ञ ज्योतिष, शिल्प, यंत्र-कर्म-विधी आणि वास्तुशास्त्राच्या इतर अंगांची योग्य माहिती असणारा हवा. या बरोबरच त्याला, आलेख, चित्रकला, काष्ठकला, चुना, धातुविद्याही यायला हवी.
वास्तुतज्ज्ञाचे गुण :-
हल्ली वास्तू बांधतांना सौंदर्य आणि टिकाऊपणा यांचा विचार जास्त केला जातो यात नैसर्गिक गोष्टींचा विचार कमी होतो. म्हणूनच आधुनिक वास्तुतज्ञाला आधुनिक घरबांधणीशास्त्राबरोबर स्थापत्यवेदातले वास्तुविषयक नियम, ‍सिद्धांत याचीही पूर्ण माहिती हवी कारण बांधलेल्या घरात राहणार्‍यांना सुख, संपन्न व आरोग्य लाभायला हवे.


यावर अधिक वाचा :

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

national news
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

national news
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

national news
अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.
Widgets Magazine

पोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा

national news
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

national news
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...

शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या

national news
मुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन

national news
नबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...

आता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग

national news
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...