शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

वास्तुप्रमाणे जमिनीचा आकार

ज्या जमिनीवर घर बांधायचे तिचा आकार जाणून घेणेही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे आहे. जमिनीच्या आकाराचा परिणाम त्याच्या मालकावर होतो. गोमुखी (पुढे लांबी कमी आणि बाकीचा भाग रुंद) प्लॉट राहणार्‍याला फायदेशीर आहे. या उलट प्लॉट उलटा असेल तर तो हानिकारक आहे. वेगवेगळ्या आकाराचे भुखंड योग्य आकारात करून घ्यावे लागतात. वास्तुशास्त्रातील ग्रंथात जमिनीच्या आकाराविषयी वर्णन आहे, वृहद्धास्तुमाला, विश्वकर्माप्रकाशन या ग्रंथांत जमिनीच्या वेगवेगळ्या आकारामुळे होणार्‍या लाभ आणि हानीची माहिती आहे. 
 
जमिनीच्या दोन्ही बाजू बरोबर हव्यात व चार कोनही समान हवेत. अशी जमीन सर्वासिद्धीदायक, चतुरक्ष/ वर्गाकार असेल तर धनलाभ. वृत्ताकार असेल तर बुद्धी वाढते. त्रिकोणी आकराची जमीन राजभय, शंकाकृती भूमी धन-नाश, दंडाकार भूमीत गायींचा नाश आणि धनुष्याकार भूमीत भीती वाटते.
 
ज्या भुखंडाचा आकार हत्ती, सिंह, घोडा, बैल या सारखा आणि गोल भद्रपीठ, भूमी, त्रिशुल व शिवलिंगासारखा आहे, ज्यात प्रासादाची जागा व कुंभ आहे अशी जमीन देवतांनाही दुर्लभ आहे. जी जमीन शंख, त्रिकोण, तबला, साप, बेडूक, गाढव, अजगर, बगळा, घुबड, कावळा, डुक्कर, बकरी धनुष्य, कर्क, शव या आकाराची आहे आणि तेथे गेल्यावर दु:ख होत असेल तर अशी जमीन टाळणेच उत्तम. 
 
इथे थोडक्यात जमिनीच्या प्रतिकूल व अनुकूल आकार, दिशा, त्याचे कोन त्याची शुभाशुभता याची माहिती दिली आहे. त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. 
 
1. सर्वोत्तम खंड - ईशान्येला रस्ते, चौकोनी आकार, समांतर वृत्त
2. उत्तम खंड - उत्तरेला किंवा पूर्वेला रस्ते, आकार आयताकार
3. मध्यम खंड - पश्चिमेला व दक्षिणेला रस्ते चौकोनी आकार समांतर वृत्त.
4. साधारण खंड - दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला रस्ते समांतर वृत्त आणि चौकोन. 
 
सुधारण्यायोग्य भूखंड - कोणत्याही आकराच्या प्लॉटला चौकोनी करणे.
खराब भूखंड - जो समांतर नसून आकार चौरस नसतो आणि जो सुधारला जात नाही.