1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2016 (22:56 IST)

आई म्हणते...

womens day
आई गर्भातल्या मुलीला म्हणते
नको येऊ या जगात 
कारण येथे कधीही 
स्त्रीजन्म पडतो महागात 
दुनिया खूप वाईट
स्त्रीवर कुठेही होतो बलात्कार 
आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू,
सासू करते सूनेवर अत्याचार
मी पाहिले येथे 
स्त्री जात नाही स्वातंत्र्यात 
कधी बापाकडे, तर कधी
नवर्‍याकडे आहे पारतंत्र्यात 
तुझे वडीलही तुझ्यात 
जन्माच्या विरोधात राहतील
तु्झ्या हिस्याचे लाडही
तुझ्या भाववरच करतील
नको येऊ तू जगात... 
अधिकार मिळणार नाही घरात 
कारण येथे स्त्री-पुरुष 
समानता नाही समाजात 
येतो विचार मनात 
कुठपर्यंत हा त्रास सोसायचा
घराबाहेर जाताच स्त्रीजातीनेच 
पदराचा नकाब का ओढायचा? 
तू तर रणरागिणी, धैर्यवती 
घाबरून चालायचेच नाही
तुझ्या जन्माचे स्वागत
करायलाच पाहिजे.
-अरविंद पी. तायडे