1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2016 (15:24 IST)

महिला दिन विशेष : घुसमट

womens day
बये ! तू आज बोल खरंच बोल
आणि... खरं तेच बोल
कळू दे तुझं मोल
नि... सांभाळलेला तोल
 
बय ! तू आज बोल  
वादळात शीड धरून 
किणकिणार्‍या हातात
कुठून येतं तुला बळ
काळच वाजविते तुझ्या‍तील 
पुरुषार्थाचे ढोल 

बये ! तू आज बोल
मूग गिळून किती युगं 
गप्प बसणारैस बोल
पदराखाली आमचे पाप
कती झाकणारैस बोल 
काजळल्याले गहिरे डोळे तुझे 
सांगताहेत उरीचे घाव कधीचे बोल

बये ! आज तू बोल 
पोल सारे दांगिकांचे खोल 
झाशीची राणी, जिजाऊ, 
अहिल्या, बहिणाई परंपरा तुझी अनमोल, 
तुझ्या शक्ती भक्तीवरच तरून आहे मदार
अनमोल जगतासाठी तुझ्या आंचलात
आहे मायेची ओल, जाणतोय आम्ही
तुझं मोल, कबी देवेंद्र म्हणतोय, 
पर सावित्रीच्या लेकी घुसमट तुझी बोल 
देवेंद्र औटी