testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कॉर्पोरेटजग ते घनकचरा व्यवस्थापन

milini parmar
कॉर्पोरेट जगतात काम केल्यानंतर तिथलं झगमगाटी आयुष्य जगल्यानंतर आणि गलेलठ्ठ पगार मिळवल्यानंतर समाजसेवा कराणं, त्यातही समाजातल्या एका गंभीर समस्येवर काम करणं तसं कठिणच पण मालिनी परमार यांनी ते शक्य करून दाखवलं.

स्टोनसुप डॉट इन च्या माध्यमातून कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी त्या झटत आहेत. मालिनी या स्टोनसुप डॉट इनच्या सहसंस्तापिका आहेत. खरं तर समाजसेवेच्या क्षेत्रात त्या अपघातानेच आल्या. पण नंतर
ते त्यांचं जीवन बनून गेलं. आयुष्याचं व्रत बनून गेलं. कार्पोरेट आयुष्यातून ब्रेक घेऊन त्यांनी समाजकार्य करायचं ठरवलं आणि नंतर मागे वळून पाहिलंच नाही. वडिल सीमा सुरक्षा दलात असल्याने मालिनी यंना देशभरात फिरता आलं. वेगवेगळ्या रज्यांमध्यला शाळांमध्ये त्यांनी शिक्षण गेतलं. दिल्लीच्या डीसीई संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर 'एचसीएल' कंपनीत वर्षभर काम केलं. आयआयएम कोलकातातून पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 'टाईम्स बँक', पुन्हा 'एचसीएल', इन्फोसिस, 'विप्रो' या आयटी क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांमद्ये त्यांनी काम केला. त्या कही वर्ष अमेरिकेतही होत्या.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एनजीओ सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांनी 2010मध्ये नोकरी सोडली. 2012मध्ये त्या एका छोट्या कंपनीत रुजू झाल्या. अर्थात त्यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं नव्हतं. 'स्पेस' या संस्थेसोबत त्या काम करत होत्या. यावेळी कचर्‍याच्या गंभीर समस्येकडे त्यांचं लक्ष गेलं. ही समस्या सोडवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यासोबत महिलांसाठी रोजगारनिर्मिती करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला. सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी एक वर्ष ब्रेक घेतला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

यातूनच स्टोनसुपची निर्मिती झाली. कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्राता काही तरी करण्याची इच्छा आणि स्वत:सोबत इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या कल्पनेतून स्टोनसुपचं रोपटं रूजलं. घनकचरा व्यवस्थापन एकट्या मालिनी यांचं काम नाही. त्यासाठी अनेक हातांची गरज असते. मालिनीचं कुटुंब या कामी मदत करतं. त्यांनी दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. मालिनी यांची आईसुद्धा या कामात मदत करते. मालिनी यांच्या 70 टक्के वेळ घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात जातो. 'ग्रीन इव्हेंट्स', 'बारो अ बॅग' सारखे प्रकल्प त्यांनी राबवले. 'स्टोनसुप कंपोस्ट मेकर' आणि 'स्टोनसुप विंग्ज' हा मासिक पाळीदरम्यान वापरण्यासाठीच्या कपची निर्मिती त्यांनी केली. या कामातून 'स्वच्च भारत मोहिमे'साठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश मालिनी देतात. प्रत्येकाने त्यांचा आदर्श ठेवायला हवा.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...

फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

national news
व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...