testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालते. पण स्त्री?

वेबदुनिया|
कोणतीही व्यक्ती ही आपल्या गुणांनी ओळखल्या जाते. जीवनात नावाला आणि रुपाला जेवढे महत्त्व नाही. तेवढे त्या व्यक्तीच्या गुणाला, कर्तृत्वाला आहे. व्यक्तीचे नाव हे केवळ त्याच्या संबोधनासाठी म्हणून आहे. एखाद्या व्यक्तिचे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचे संपूर्ण जीवन, त्याचे वैशिष्ठय, त्याचे गुण आपल्या नजरेसमोर येत असतात, व्यक्तीची संपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व होय.
पुरुषाचे व्यक्तित्व आणि स्त्रीचे व्यक्तित्व यात फारसा फरक नाही. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर पुरुषाला उत्कृष्ठ आणि स्त्रीला निकृष्ठ ठरवता येत नाही जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात आज स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीनी आपल्या श्रेष्ठतेचा झेंडा फडकवला आहे. पण असे जरी असेल तरी पुरुषांची आणि स्त्रियांची काही क्षेत्रे ही वेगळी आहेतच. त्यांच्या जीवनारितीत फरक आहे. भावनांच्या प्रगटीकरणातही फरक आहे.

प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे वेगळेच असते. अमूका सारख्या अमूक असे जरी आपण म्हणत असतो तरी कुणा एकासारखा कुणी एक अगदी तंतोतंत असूच शकत नाही. साम्य असेल, पण फार कमी प्रमाणात. अमुकासारखे होण्याचा हट्ट जेव्हा एखादी व्यक्ती धरते, तेह्वा त्याचे व्यक्तिमत्त्व ती आपल्यात उतरवू इच्छिते. केवळ नाव, शिक्षण, परिवार यांच्या आधारावर कुणालाही आपले व्यक्तित्व घडविता येत नाही.

स्त्री पुरुष यांना आपण कितीही समान म्हटले तरी स्त्री ही निसर्गतःच पुरुषापेक्षा वेगळीच. तिला आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी काही वेगळेच प्रयत्न करावे लागतात. स्त्रीला स्वतःच्या व्यक्तित्व विकासासाठी स्वावलंबी, स्वतंत्र आणि आत्मनिर्भय असायलाचं हवे. तिचे विचार, तिची जीवनशैली, तिच्या आत्मविश्वासाचे रूप समर्थ असेच असते. जितके स्वावलंबी स्त्रियाचे व्यक्तित्व समर्थ असते तितकेच आपल्या पिता, पती किंवा अन्य पुरुषावर अवलंबून असणार्‍या स्त्रीचे व्यक्तित्व इतके समर्थ बहुधा दिसत नाही. अर्थात आपले प्रगल्भ व्यक्तिमत्त्व सिद्घ करण्यासाठी प्रत्येकानी ऑफिसात जाऊन नोकरीच करायला हवी, असे मात्र मुळीच नाही. माझी एक मैत्रीण करुणा ही कुठेही नोकरी करत नाही.

पण अनेकांना ती नोकरीच करते असे वाटते. कारण तिचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व. उत्तम गृहिणी होऊन आपले घर उत्तमरीत्या ती चालवते. घरातल्या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडते. बाहेरची, बँकेची सगळी कामे तीच बघते. मुलांच्या समस्या, घराबाबतच्या आर्थिक समस्यांबाबतचे निर्णय ती स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडते.

एव्हाना तिच्या यजमानांचा तिच्यावर इतका विश्वास बसलाय की आता ते उगाचच घरातल्या बाबींमध्ये लुडबुड करीतच नाही. सुशिक्षित आहेच. बोलण्याची पद्घती नम्र तर आहेच. गरज पडल्यास चांगलीच कडकलक्ष्मी. त्यामुळे कुठेही तिला आतापर्यंत वाईट अनुभव आलेला नाही. सगळ्या मॅनर्स, एटिकेट्सनी तिचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण आहे. आपल्या सोज्वळ बोलण्यातून ती कुणावरही सहज छाप पाडते. मात्र याउलट अनेकदा नोकरी करणार्या स्त्रिया अतिशय गबाळ असतात. बोलण्यात अजिबात आत्मविश्वास नसतो. आपल्या चाकोरीबद्घ कामाच्या पलीकडे काय जग आहे याची त्यांना अजिबात कल्पना नसते. बँकेचा फॉर्म भरताना हात कापतो. एखाद्या मोठ्या ऑफिसात गेल्या की, एखाद्या खेड्यातून आल्यासारख्या गांगरून जातात.

आपले व्यक्तिमत्व उठून दिसावे यासाठी स्त्रिया अनेकदा आपल्या सौंदर्याचा उपयोग करतात. सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालते. पण स्त्री? सौंदर्याचा व्यापार मात्र ह्वायला को. अन्नाची गोडी प्रत्यक्ष अन्नात नसून ती मिठात असते. त्याचप्रमाणे सौंदर्य हे व्यक्तीत नसते तर तिच्या व्यक्तिमत्त्वात असते.

आरोग्य, गृहविज्ञान, आत्मविश्वास व्यवहार कुशलता याचं शिक्षण जसे स्त्रीला मिळायला हवे तसेच आदर्श पत्नी, आणि भगिनी ठरण्यासाठी लागणारे शिक्षणही स्त्रीनी घ्यायला हवे. अर्थात यासाठी तिला कोणत्या महाविद्यालयात जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. तर या सगळ्या गोष्ठी आत्मसात करण्याची तयारी असेल तर अनुकरणाने आणि नवनवीन शिक्षण्याच्या इच्छेने घडू शकते, निव्वळ शिक्षणाने व्यक्तित्वाची उंची वाढत नाही. एखाद्या स्त्रीने खप परिश्रम घेऊन उच्च दर्जाची पदवी प्राप्त करून घेतली असली, तरी आपले जीवन दुसर्यांना आकर्षक, प्रेरक आणि आदर्श ठरण्यासाठी तिला आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा योग्यरीत्या उपयोग करून जीवन शिळेतून सुंदर मूर्ती कशी आकारेल यासाठी प्रयत्नच करावे लागतील.

तथाकथित उच्च विद्याविभूषित स्त्रीपेक्षा एखादी अडाणी किंवा साधारण शिकलेली स्त्री फार चांगली असे म्हणण्याची पाळी अनेकदा आपल्यावर येते. कारण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेजार्‍या पाजार्‍यांशी तिचे फार चांगले संबंध असतात. आपल्या हसर्‍या, मनमिळावू, प्रेमळ, कामसू स्वभावामुळे तिने सर्वांचे मन जिंकलेले असते. ती सर्वाना हवीशी वाटते. अनेकांना प्रेरक आदर्श वाटते. म्हणजेच गृहिणी म्हणून काम करणार्‍या स्त्रिया देखील आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवू शकतात.

एक स्त्री आपले घर चालविताना येणार्‍या संकट प्रसंगांच्या वेळी कशी धीरोदात्तपणे वागते, तिला आपल्या नात्यातील लोकांशी मर्यादा सांभाळून रीतीप्रमाणे प्रेमाचे संबंध कशी राखते, तिला मिळणार्‍या वेळेचा ती योग्य रीत्या कशी उपयोग करून घेते, उपलब्ध सोयी, गोष्टीतूनच आपला संसार ती कशी चालवते, आपल्याकडे येणार्‍या अतिथीचा ती कशाप्रकारे आदर-सत्कार करते, या सर्व प्रश्नांची जितक्या प्रमाणात समाधाकारक उत्तरे मिळतील तितक्या प्रमाणात तिचे व्यक्तिमत्व आदर्श ठरते.

आत्मविश्वास आणि आत्मनिर्णयाचे सामर्थ्य जी नीट ओळखेल ती आपल्या जीवनातला उत्कर्ष बिंदू सहजरीत्या गाठू शकते. ज्या स्त्रीला स्वतःला काही करण्याची आकांक्षाच नाही तर तिला कोणी कितीही मार्गदर्शन केले तरी फायदाच नाही. कारण आपल्यात काही बदल व्हावा, अशी तिची इच्छाच नाही. आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या जीवनाला स्थैर्य कधी येतच नाही. ते विस्कटूनच जाते. त्यामुळे महिलांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघत नाही. चांगल्या शिकलेल्या स्त्रिया देखील याचमुळे चार सामान्य स्त्रियांसारख्या 'चूल आणि मूल' मध्ये अडकून पडतात. त्यांचा व्यक्तित्वाची माती माती होते. मात्र आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांची जर इच्छा असेल तर जीवनात त्या काहीही साध्य करू शकतात.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

पाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...

national news
कोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

national news
वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना ...

मॅक्सिकन भेळ

national news
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये ...

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

national news
गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर ...

तवा पनीर

national news
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या ...