testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आई गा ना अंगाई

- श्याम

वेबदुनिया|
निद्रेच्या त्या करूनी विनवण्या
आज जरी मी मिटे पापण्या नीज न ती येई
आई, गा ना अंगाई

जीवन सारे धुंदीत जगलो
माझ्यातच मी हरवून बसलो
विसरून तुज आई
आई, गा ना अंगाई

आईविण पोरका, भिकारी
आज फोडतो हंबरडा मी
जवळ मला घेई
आई, गा ना अंगाई

रुसू नको मज वेड्यावरती
नीज येई तो माथ्यावरती
हात फिरव आई
आई, गा ना अंगाई.


यावर अधिक वाचा :