Widgets Magazine
Widgets Magazine

मातृदिन विशेष : माय

mothers day
पहाटे मायेचं माझ्या फिरत होत जातं
ओठावरल्या ओव्यांनी तिची
फुलत होती पहाट


देवाजवळील दिव्यात ती
लावत होती वात

सुखी संसाराचं स्वप्न
पाहत होती मनात


काट्याकुट्या तुडवून तीच
आटत होतं रक्त
मुलांसाठी तरी ती
उपसत होती कष्ट


अंधाराचीच जेव्हा अशी
नीशा होती दाट
झाली सूर्य तेव्हा
उगवली प्रकाशाची वाट.

- दीपक मधुकर बंड


यावर अधिक वाचा :