1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (07:41 IST)

मुंबईत वर्षभरात 14 हजार नसबंदी

mumbai mahapalika
14 thousand sterilizations per year in Mumbai मुंबई महापालिकेतर्फे सन २०२२ ते २०२३ या कालावधीत महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १४ हजार ५०९ अधिक नसबंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, १४ हजार २९ महिला आणि ४८० पुरुषांचा समावेश आहे. तसेच, ३ हजार ८९५ महिलांनी अंतरा या गर्भनिरोधक इंजेक्शनसाठी निवड केली. तर, ३९ हजार ४७७ महिलांनी कॉपर-टीचा पर्याय निवडला. या कालावधीत १४ हजार ५८१ गर्भनिरोधक गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरुष नसबंदीची संख्या व अंतरा आणि छाया या तात्पुरत्या गर्भनिरोधक पद्धतींचा अवलंब करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.
 
दरवर्षी ११ जुलै रोजी जगभरात लोकसंख्या दिवस आयोजित केला जातो. याच अनुषंगाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई महापालिकेतर्फे ११ जुलैपासून २४ जुलै २०२३ या कालावधीमध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सर्व आरोग्य केंद्रांमध्ये इच्छुक दांपत्याला कुटुंब नियोजनाच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.