गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (12:39 IST)

डोबिवलीत पार्किंगच्या वादावरून 2 तरुणांवर कार चढवली

डोंबिवलीत एका कार चालकाने तरुणाच्या अंगावर थेट कार चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पार्किंगसाठी जागान दिल्याने संतापात येऊन कार चालकाने हे कृत्य केले. 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. भररस्त्यात एक पांढऱ्या रंगाची मारुती वॅगन आर कार वेगाने आली. कार चालकाने वाहनाचा वेग वाढवून दोघांच्या अंगावर धावून गेली तरुण कारच्या  पुढे धावताना दिसत आहे. दोघे कसा तरी आपला जीव वाचवत पळत आहे. नंतर वाहन चालक देखील निघून जातो. या घटनेत संजय यादव नावाचा एक व्यक्ती जखमी झाला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळापूर्वी दोन्ही तरुणांचा कार पार्किंगवरून वाद झाला होता.  मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.पोलीस पीडितांचे जबाब घेऊन प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. कारच्या क्रमांकावरून कार चालकाची ओळख पटली आहे. 
Edited By - Priya Dixit