1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:03 IST)

डोंबिवलीत भंगाराच्या ३०-४० गोडाऊनला भीषण आग ; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

fire
ठाणे जिल्ह्यात आगीची मोठी घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील टाटा पावर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात मध्यरात्री दोन ते तीन वाजता भीषण आग लागली. या आगीवर पहाटेपर्यंत नियंत्रण आणता आले नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दहा ते बारा गाड्यांचे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
 
सुदैवाने आगीत कोणतीही जीवन हानी झाली नाही. आगीचे कारणही स्पष्ट झाले नाही. परंतु या आगीमुळे सकाळी परिसरात धुरांचे लोट पसरले होते. अखेर 7 तासांच्या प्रयत्नानंतर डोंबिवली टाटा पावर गोळवली येथील भंगाराच्या गोडवूनची आग नियंत्रणात आली. त्यानंतर आता सध्या कुलिंगचे काम सुरू करण्यात आले.
 
आगीचे रौद्ररुप, गोडाऊन खाक
टाटा पावर गोळवली भागात पत्रे ठोकून भंगारांचे गोडाऊन उभे करण्यात आले होते. या गोडावूनमध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक उपनगरामध्ये भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींकडून कापडाचा चिंध्या, प्लास्टिकच्या बॉटल, पिशव्या, लाकडी सामान घेऊन या गोडाऊनमध्ये ठेवले जात होते. त्यानंतर प्लास्टिकपासून विविध प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना हे प्लास्टिक दिले जात होते.
 
यासाठी या परिसरात 40 ते 50 गोडाऊन आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल आहेत. या ठिकाणीच आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं होतं. यामुळे 30 ते 40 गोडाऊन यात जळून खाक झाले आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाल होतं. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर , अंबरनाथ परिसरातून सात ते आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत.
 
अग्नीशमन दलाच्या प्रयत्न सुरुच
आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले आहे. अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor