1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (19:48 IST)

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

relay race
भारताचे पुरुष आणि महिला रिले संघ पॅरिस ऑलम्पिक साठी पात्र ठरले आहे. भारतीय महिलांचा 4x400 मीटर रिले संघ सोमवारी जागतिक ऍथलेटिक्स रिलेमध्ये दुसऱ्या फेरीत दुसऱ्या स्थानावर राहून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. भारतीय पुरुषांचा 4x400m रिले संघ देखील पॅरिस ऑलिम्पिकसाठी नासाऊ, बहामास येथील जागतिक ऍथलेटिक्स रिले येथे दुसऱ्या फेरीतील हीट शर्यतींमध्ये पात्र ठरला.

महिलांच्या स्पर्धेत हीट क्रमांक 1 मध्ये जमैकाने प्रथम स्थान पटकावले. रुपल चौधरी, एम आर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन यांनी  दुसरे स्थान पटकावले. भारतीय संघाने रविवारी पहिल्या फेरीच्या पात्रता फेरीत तीन मिनिटे आणि 29.74 सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले

पुरुष संघाचा समावेश असलेल्या पॅरिस स्पर्धाचे तिकीट मोहम्मद अनस याहिया, मुहम्मद अजमल, अरोकिया राजीव, अमोज जेकब यांनी 3 मिनिटे आणि 3:23 सेकंद वेळात दुसरे स्थान पटकावले. तर यूएस संघ प्रथम क्रमांकावर होता.  

दुसऱ्या फेरीतील तीन हीट मधील अव्वल दोन संघ पॅरिस ऑलम्पिक साठी पात्र ठरतील. ही स्पर्धा या वर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा 1 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. आतापर्यंत 19 ट्रॅक आणि फिल्ड एथलीट पात्र ठरले आहे. या मध्ये भालपटू नीरज चोप्राचा समावेश देखील आहे. 
 
Edited By- Priya Dixit