शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (21:37 IST)

वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

minor
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भायखळ्यात राहणार्‍या एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीने एका लहान मुलीला चहा आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. नंतर या मुलीला एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणालाही सांगायचे नाही असे धमकी ही त्या मुलीला दिली होती.
 
 नंतर मुलीने आपल्या आईला झाला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईन तत्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली आणि त्याची रवानगी तुरुंगाग केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.