शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (15:44 IST)

८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नाही

मुंबईत दररोज सापडणाऱ्यां पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त करोना रुग्ण सापडले पण त्यातल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती असे चहल यांनी सांगितले.
 
लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील ७८ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत, तेच मुंबईत ४९ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागच्या काही आठवड्यातील डाटाचे विश्लेषण केल्यानंतर ७८ ते ८२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी म्हणाले.