शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (12:19 IST)

साकीनाका भागात 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

rape
मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

या प्रकरणी मुलाच्या विरोधात मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलाने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी मुलगा इयत्ता नववीत शिकतो. पीडित मुलीचे कुटुंब 15 दिवसांपूर्वी मुंबईत वास्तव्यास आले. या पूर्वी ते सोलापुरात राहत होते. आरोपी मुलाला अटक करण्यात आली असून त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. 
Edited by - Priya Dixit